प्रथिनांमुळे मधुमेहाला अटकाव

जगन्नाथ दीक्षित यांनी दिला मधुमेहमुक्तीचा मंत्र
प्रथिनांमुळे मधुमेहाला अटकाव

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

दिवसभरात कडक भूक लागण्याच्या वेळा ओळखा. दिवसातून त्या दोन वेळांनाच जेवण करा. 55 मिनिटांत जेवण संपवा. दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका. गोड (sweet) कमी खा. जेवणातून प्रथिने (Protein) वाढवा. असे केले तर मधुमेहाला (diabetes) दूर ठेवणे सहज शक्य असल्याचे सांगत प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित (Health Expert Dr. Jagannath Dixit) यांनी मधुमेहमुक्तीचा मंत्र सिन्नरकरांना (sinnar) दिला.

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त (Amritmahotsavi Varsha) नगरपरिषदेच्या महिला व बालविकास समितीच्या (Women and Child Development Committee) वतीने नगरपरिषदेच्या अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) माजी अध्यक्ष शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती वामने, दीप्ती वाजे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका वर्षा लहाडे, नगरसेविका सुजाता तेलंग, नगरसेवक शैलेश नाईक, पंकज मोरे, मुख्याधिकारी संजय केदार व्यासपीठावर उपस्थित होते.

कुठलाही प्राणी पोट भरल्यानंतर खात नाही. मात्र मनुष्याचा जिभेवर ताबा नाहीे. मिळेल ते आपण पोटात टाकल्याने शरीरावर परिणाम होतो आणि विविध आजार मागे लागतात. लठ्ठपणा (Obesity) कमी झाला तर कॅन्सरचा (cancer) धोका 70 टक्के कमी होतो. वजन कमी (weight loss) करण्यासाठी दिवसभरात फक्त दोन वेळा जेवा. इतर वेळी तोंड फक्त बोलण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी उघडा, असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी केले. रक्तात वाढलेल्या इन्सुलिनमुळे लठ्ठपणा येतो.

शरीरात 24 तास इन्शुलिन (Insulin) तयार होत असते. 18 ते 32 युनिट खाण्यातून इन्शुलिन तयार होते. कमी-जास्त खाल्ले तरी इन्शुलिन तेवढेच तयार होते. एकदा इन्शुलिन तयार झाल्यानंतर पुन्हा तयार व्हायला 55 मिनिटे लागतात. शरीरातील रक्तात करोडो पेशी असतात. त्यांना दररोज सरासरी दोन हजार कॅलरीज (Calories) ऊर्जा लागते. एक ग्रॅम ग्लुकोज (glucose) जळाल्यास चार कॅलरी ऊर्जा मिळते.

एक ग्रॅम चरबी जळाल्यास नऊ कॅलरी ऊर्जा मिळते. इन्सुलिन वाढल्यामुळे लठ्ठपणा वाढतो, चरबी वाढते, चरबी वाढण्याचा आणि तेल, तूप खाण्याचा काहीही संबंध नाही. मात्र इन्सुलिन वाढल्याने मधुमेहाकडे वाटचाल सुरू होते. त्यामुळे इन्शुलिनची लेव्हल कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी कमी वेळा खाणे महत्त्वाचे ठरते. गूळ, साखर, मधासारख्या पदार्थांनी कुणाचेही भले झालेले नाही.

माणसाच्या 70 किलो वजनात 13 किलो चरबी असते. चरबीचा हा स्टॉक साठ दिवस उपयोगात येऊ शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या. दररोज 45 मिनिटांत साडेचार किलोमीटर चला किंवा 45 मिनिटे पोहायला जा. या माध्यमातून आरोग्य रोज कमवावे लागेल व टिकवावे लागेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दीक्षित यांच्या सांगण्याप्रमाणे वागल्यास अर्ध्या व्याधी कमी होतील, असे राजाभाऊंनी सांगत डॉ. दीक्षित यांच्या यू-ट्यूब ते गुगलपर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. वामने यांनी प्रास्ताविक केले.

जीवनशैली बदला

मधुमेह हा आजार दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. दोन जेवणांमध्ये पाणी, ग्रीन टी, ब्लॅक टी, 25 टक्के दूध आणि 75 टक्के पाण्याचा बिनसाखरेचा चहा, नारळ पाणी, टोमॅटोच्या एक-दोन फोडी आपण खाऊ शकतो. जेवणाच्या आधी ड्राय फ्रूटस्, फळे, गोड पदार्थ खावेत. त्यानंतर वाटीभर सलाड अथवा मोड आलेले कडधान्य अथवा दोन उकडलेली अंडी खावीत. यानंतर आवश्यक तेवढे शाकाहारी अथवा मांसाहारी जेवण करावे.

मधुमेह असणार्‍यांनी जेवण सुरू करताना ड्रायफूटस्, गोड सोडून अक्रोड, बदाम खावेत. गाजर, बीट सोडून उरलेले सलाड खावे. जेवण इतरांप्रमाणेच करावे. जीवनाचा आनंद घेण्याचे माध्यम शरीर असून शरीर चांगले असणे महत्त्वाचे आहे. आपण कुठले अन्न खातो यावर शरीर अवलंबून नसून आपला मंत्र स्वीकारला तर मधुमेह, थायरॉईडसारखे आजार थांबवणे सहज शक्य आहे. त्यासाठी कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायला शिका, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.