नगररचना, उद्यान विभागाच्या कार्यालयाबाबत प्रस्ताव

नगररचना, उद्यान विभागाच्या कार्यालयाबाबत प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील काही वर्षांमध्ये नाशिक शहराचा( Development of Nashik City ) झपाट्याने विकास झाला आहे. यामुळे शहरात बाहेरून येणार्‍या नागरिकांनी संख्या वाढली आहे, त्याचा परिणाम नाशिक महापालिकेच्या कामकाजावर देखील झाला पडत असून लोकसंख्या वाढत असताना नागरिकांना चांगल्या प्रकारे सुखसुविधा देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न असले तरी मनुष्यबळाची कमतरता तसेच छोटे पडणारे कार्यालय हा देखील एक कारण असल्यामुळे नाशिक महापालिकेतील नगररचना विभाग (Town Planning Department) तसेच उद्यान विभाग ( Garden Dept )आता एकाच कार्यालयात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या टेबलावर आहे.

नाशिक शहर परिसरातील सर्व भागांमध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या आहे. नव्या डीपीआर कायद्यानुसार तर त्यांची उंची अधिक वाढत चालली आहे. नाशिक शहर तसे पाहिले गेले, तर मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने विकसित झाला असल्यामुळे तसेच रोजगाराच्या अनेक संधी मिळत असल्यामुळे राज्यासह देशभरातील नागरिकांचे आकर्षण नाशिक शहराकडे वाढले आहे, त्यातच येथील वातावरण देखील पोषक असल्यामुळे त्यात भर पडली आहे. शहराचा विकास होत आहे, त्याप्रमाणे नागरिकांना सुविधा देणेदेखील महापालिकेला बंधनकारक आहे.

नवीन इमारत तसेच घर बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात पाठपुरावा करण्यात येतो, लेआउट मंजूर पासून बिल्डिंग प्लान, कमिसमेंट तसेच कम्प्लिशन अर्थात पूर्णत्वाच्या दाखला नगररचना विभागाच्या माध्यमातून देण्यात येतो. त्यामुळे या विभागात अनेक वर्षांचा रेकॉर्ड देखील सांभाळावा लागतो तर येणार्‍यांची संख्या देखील अधिक असल्यामुळे हा सध्याचा कार्यालय अगदी छोटा पडत असल्यामुळे समोरच असलेल्या उद्यान विभागा व नगर रचना विभाग हा एकच कार्यालयात आणून रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त यांच्या टेबलावर आहे, तसेच मनुष्यबळाची कमी देखील दूर करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. असे झाले तर नागरिकांना चांगल्या सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com