कोविड विंगमध्ये बालरोग अतिदक्षता विभागाचा प्रस्ताव

कोविड विंगमध्ये बालरोग अतिदक्षता विभागाचा प्रस्ताव
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना Corona विषाणूच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर Possible third wave of corona नाशिकच्या हॉस्पिटलमधील कोविड विंग मध्ये 42 खाटांचा अद्ययावत बालरोग अतिदक्षता विभाग Pediatric Intensive Care Unit उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात District Surgeon Dr. Ashok Thorat यांनी दिली आहे.

सध्या रुग्णालयाच्या करोना विभागात कमी रुग्ण दाखल आहेत. एप्रिल आणि मे च्या तुलनेत संसर्गाचे प्रमाण देखील खूपच कमी झाले आहे. तथापि, अजूनही साथीच्या रोगाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार, करोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांवर परिणाम होऊ शकतो, या अंदाजाने बालरोग आयसीयू उभारण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता तयार करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनस्तरावरून हिरवा कंदील मिळल्यास कामे सुरू करता येतील.

दरम्यान, कळवण ग्रामीण रुग्णालय आणि मालेगाव सामान्य रुग्णालयातही या पद्धतीची व्यवस्था करण्यात येत आहे. बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागासाठी लागणारी वैद्यकीय यंत्रसामग्री आणि साधने सामान्य अतिदक्षता विभागापेक्षा वेगळी असून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. शहरातील बिटको रुग्णालयात बालरोग वॉर्डही सज्ज ठेवण्यात आला आहे.

एप्रिल मे च्या तुलनेत सध्या रुग्णसंख्या कमी आहे. लसीकरण चांगले झाले असल्याने तिसर्‍या लाटेचा धोका कमी प्रमाणात आहे. मात्र, असे असूनही आपली तयारी पूर्ण असावी, म्हणूनच बालरोग अति दक्षता विभाग तयार करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला आहे.

- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com