मनपा शाळेतील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव

मनपा शाळेतील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे NMC तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळा विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता. यामुळे महापालिकेच्या शाळांमधील NMC Schools एकूण सुमारे 193 उपशिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

या उपशिक्षकांना इतर ठिकाणी पाठवण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र, मनपाच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची सुमारे 30 तर पदवीधर शिक्षकांची 181 पदे रिक्त असल्याने पदोन्नतीने अतिरिक्त शिक्षकांचा NMC School Teachers प्रश्न निकाली काढण्याची तयारी मनपाच्या शिक्षण विभागातर्फे सुरू झाली आहे. यामुळे 30 शिक्षकांना बढती मिळून ते मुख्याध्यापक होणार आहेत.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्येवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडू लागल्या असून, एका शाळेचे दुसर्‍या शाळेत विलिनीकरण करण्याची वेळ आली आहे.

आयुक्त मुंढे यांच्या काळात 35 शाळांचे लगतच्या परिसरातील शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेच्या शाळांचा आकडा 123 वरून 88 वर आला. परिणामी या शाळांमधील उपशिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मराठी माध्यमासाठी एकूण 806 मंजूर पदे आहेत. त्यात मुख्याध्यापकांची सुमारे 62 पैकी 34 पदे कार्यरत आहेत. तर पदवीधर शिक्षकांची 247 मंजूर पदांपैकी केवळ 66 पदे कार्यरत आहेत. उपशिक्षकांची 497 मंजूर पदे असली तरी कार्यरत शिक्षकांची संख्या फक्त 690 आहेत. यामुळे या अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न गंभीर बनत आहे.

या शिक्षकांचे अन्य ठिकाणी समायोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, पदोन्नतीने त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. तरी अतिरिक्त ठरणार्‍या 193 पैकी सर्वच पदोन्नतीस पात्र ठरणार नसल्याने इतर उपशिक्षकांना मनपाकडून बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. यामुळे मनपा शिक्षण मंडळाने आता पदोन्नतीची कार्यवाही सुरू केली असून, लवकरच पदोन्नतीने सुमारे 30 मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

प्रशासनाकडे प्रस्ताव रवाना Proposal sent to administration

मिळालेल्या माहितीप्रमाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून सामान्य प्रशासन विभागाकडे रवाना केला आहे. यामुळे लवकरच त्याच्यावर कारवाई होऊन शिक्षण विभाग पदोन्नती करणार आहे. उर्दू माध्यमातही 94 मंजूर पदांपैकी 35 पदे रिक्त असून, हिंदी माध्यमातही 41 पैकी 29 पदे रिक्त आहेत. प्राथमिक विभागाप्रमाणेच माध्यमिक विभागातही अनेक पदे रिक्त आहेत. मराठी अनुदानीतचे 17 पैकी पाच पद रिक्त असून, विनाअनुदानीतचे 51 मंजूर पदांपैकी नऊ तर उर्दू अनुदानीत माध्यमचे 12 पैकी सात पद रिक्त आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com