पादचारी पुलाच्या कामासाठी प्रस्ताव

पॅसेंजर लवकरच सुरू; रेल्वे व्यवस्थापक केडिया यांचे संकेत
पादचारी पुलाच्या कामासाठी प्रस्ताव

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव रेल्वे स्थानकावरील ( Nandgaon Railway Station ) पादचारी पुलाचे थांबलेले काम (pedestrian bridge work ) पुन्हा सुरू व्हावे, या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळावी यास्तव आपण पाठपुरावा करत असून मंजुरी मिळताच कामास प्रारंभ केला जाईल, असे सूतोवाच करत भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया (Bhusawal Divisional Railway Manager S. S. Kedia )यांनी पॅसेजर गाड्या लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले.

मध्य रेल्वे भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच रेल्वे स्थानक परीक्षणासाठी नांदगावी भेट दिली असता दै.‘देशदूत’शी वार्तालाप करताना ते बोलत होते.

रेल्वे स्थानकावर व्यवस्थापक केडीया यांनी विविध विभागांची पाहणी करत माहिती घेतली. स्टेशन प्रबंधकांच्या दालनात पत्रकार संजय मोरे आणि अनिल आव्हाड यांनी रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत केडिया यांचे लक्ष वेधत चर्चा केली. नांदगाव रेल्वे स्थानकावरील रद्द करण्यात आलेल्या काशी, कामायनी, महानगरी, जनता, झेलम एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत व्हावे तसेच शहरातील रेल्वे गेटजवळ बनविण्यात आलेल्या लेंडी नदीच्या बाजूने मागील वर्षी अंडरपास तयार करण्यात आलेला आहे.

त्या ठिकाणी पाणी साचून नांदगाव शहराच्या अडचणीत भर पडलेली आहे. अंडरपासमुळे नांदगाव शहराचे दोन भाग पडले. असुन शहराचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे शहरवासियांचे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना झाली पाहिजे अशी जनतेसह प्रवाशांची अपेक्षा असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

भुयारी मार्गात साचणार्‍या पाण्याबाबत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा करुन ही समस्या तातडीने मार्गी लावली जावी, तसेच प्रवाशी गाड्यांना थांबे देण्याबाबत रेल्वे बोर्डाकडून सुचना आल्यावर अंमलबजावणी केली जाईल. लवकरच पॅसेंजर गाड्या सुरू केल्या जाणार असून नांदगाव स्थानकावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन व्यवस्थापक केडिया यांनी यावेळी बोलतांना दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com