नदी संवर्धन योजनेच्या निधीसाठी प्रस्ताव

नदी संवर्धन योजनेच्या निधीसाठी प्रस्ताव

दे.कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

शहरातील नद्या, उपनद्या यांची स्वच्छता व्हावी, प्रदूषण Pollutionकमी व्हावे शिवाय महानगरपालिका NMC हद्दीतील मलजल व्यवस्थापन सुरळीत असावे, यासाठी चार मलनि:सारण केंद्राच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव महानगरपालिकेकडून राज्य सरकार व तेथून केंद्र सरकारकडे जाणार असल्याने या बाबत खा. हेमंत गोडसे यांनी राज्याचे पर्यावरण अधिकार्‍यांशी चर्चा करत हा प्रश्न मार्गी लावणेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाने जो प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार नदी संवर्धन योजनेत नाशिक मनपाचा समावेश व्हावा आणि त्यासाठीची मान्यता तसेच शिफारस राज्यशासनाकडून केंद्रशासनाला करण्यात यावी, यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव मनपा प्रशासनाने आज राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे सुपूर्द केला आहे.

सदर प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत खा. गोडसे यांनी मंत्रालयात पर्यावरण विभागाचे सचिव मनिषा वर्मा यांची भेट घेत शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि गोदावरीच्या संवर्धनासाठी ही योजना अत्यंत गरजेची असून सदर प्रस्ताव लवकरात लवकर केंद्राकडे पाठविण्याच्या सूचना केल्या.

तपोवन, आगर टाकळी, चेहडी, पंचक या ठिकाणच्या मलनि:सारण केंद्रांच्या अधुनिकरणासाठी आणि पुढील पाच वर्षे दुरूस्तीसह देखभाल करण्यासाठी 400 कोटी रूपयांचा निधीची आवश्यकता असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मनपा क्षेत्रातील जलमल व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असून उच्च न्यायालयानेही नवीन मानंकानुसार जलनि:सारण केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

Related Stories

No stories found.