'हर घर तिरंगा' उपक्रमाची जय्यत तयारी

'हर घर तिरंगा' उपक्रमाची जय्यत तयारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाची 75 वर्षेपूर्तीनिमित्त(75th anniversary of Indian independence) 'हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga initiative )या उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सात लाखांहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहेत. यासाठीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D)यांनी दिली आहे.

भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.

या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

नियोजन करण्याच्या सूचना

जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदी बाबत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांना सुद्धा याबाबत प्रशिक्षण देऊन तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com