ओबीसींची योग्य माहिती संकलित व्हावी : समता परिषदेची मागणी

ओबीसींची योग्य माहिती संकलित व्हावी : समता परिषदेची मागणी

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

समर्पित आयोगामार्फत ओबीसी समाजाचा (OBC Community) इम्पेरिकल डाटा (Imperial data) सदोष पद्धतीने होत असल्याने ओबीसी समाजाचे नुकसान व फसवणूक होणार आहे.

ओबीसी समाजाची शासकीय कर्मचार्‍यांमार्फत योग्य ती माहिती संकलन करावी, अन्यथा तीव्र आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या (Mahatma Phule Samata Parishad) वतीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे (Tehsildar Siddharth More) यांना निवेदनाव्दारे (memorandum) देण्यात आला आहे.

समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांतर्फे तहसीलदार मोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्देशीत केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलीत करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठीत केला आहे. सदर आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा (Imperial data) घरोघर जावून ओबीसी समाजाची खरी आर्थिक (Financial), सामाजिक (social), राजकीय (political), शैक्षणिक (Academic) स्थिती व परिस्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित असतांना

सदर माहिती ही सॉफ्टवेअरव्दारे आडनावानुसार सदोष पद्धतीने संकलित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ओबीसी समाजाची फसवणूक होवून ओबीसी समाजाचे भविष्यात कधी न भरुन येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे सदर आयोगामार्फत चुकीचे होणारे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व शासकीय तलाठी (talathi), कर्मचारी, अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), आशावर्कर या कर्मचार्‍यांमार्फत योग्य ती माहिती संकलीत करुन शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावी, अन्यथा समता परिषदेच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे

निवेदनावर समता परिषदेचे शहराध्यक्ष शिवा सोनवणे, दीपक खैरनार, अशोक पाटील, माजी नगरसेवक वाल्मिक टिळेकर, सचिन देवकाते, मुकूंद खैरनार, सरपंच सचिन जेजूरकर, सुरेश गायकवाड, डॉ. भरत जाधव, मोसिम शेख, सचिन सोमासे, राहुल नाईक, सुधाकर निकम, चिंधा बागूल, प्रशांत पाटील, राजू बागूल, बाळासाहेब खैरनार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com