प्रतिकूल परिस्थितीत तत्पर सेवा

प्रतिकूल परिस्थितीत तत्पर सेवा

खेरवाडी। वार्ताहर Niphad / Khervadi

वाढता करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ते जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणेने कंबर कसले असता आंतर रुग्णांबरोबरच तालुक्यात सर्वात जास्त बाह्य रुग्णांना (ओपीडी) सेवा देणारे रुग्णालय म्हणून ओळख असलेले चांदोरी प्रा. आ. केंद्र मात्र अपुर्‍या सेवकांच्या माध्यमातूनसुद्धा तत्परतेने सेवा देत असल्याने केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्ण, त्यांचे नातलग व ग्रामस्थांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

जीर्ण झालेली येथील रुग्णालयाची इमारत काढून त्याच जागेवर चार वर्षापासून कासवगतीने नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने तूर्तास पर्यायी जागेत हॉस्पिटल स्थलांतरित न करता बाजूलाच असलेल्या छोट्याशा कुटुंब कल्याण वॉर्डात प्रसूती करणे. रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळा व कार्यालयीन कामकाज केले जाते. तसेच शेजारीच मोडकळीस आलेल्या चार खाटांच्या वार्डात केस पेपर देणे, रुग्ण तपासणी करणे, औषधे देणे, मलमपट्टी व इतर उपचार करणे तसेच अत्यवस्थ रुग्णांना सलाईन लावणे आदी कामांबरोबरच करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनासदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र घेणार्‍यांची अफाट संख्या हे सर्व कामे एवढ्याशा जागेत करत असताना रुग्णांना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी सेवकांच्या नाकीनऊ येत आहे.

हे केंद्र महामार्गालगत असल्याने या केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पंधरा गावांच्या व्यतिरिक्त इतर पाच-सहा गावांचे रुग्ण व अपघातग्रस्त रुग्ण, वीट भट्टी व ऊसतोड कामगार या केंद्रात उपचारार्थ येत आहेत. येथे शिपाई 3, वैद्यकीय अधिकारी 1, आरोग्य सेवक 2 या जागा रिक्त असतांना शस्त्रक्रियासारखे जोखमीचे काम हे सेवक तत्परतेने करीत आहे. जि. प. आरोग्य विभागाकडून पुरवली जाणारी औषधे बर्‍याचदा कमी पडल्याने रुग्ण कल्याण समिती निधीतून विशिष्ट औषधे खरेदी केले जातात. हे केंद्र पूर कक्षेत येत असल्याने पावसाळ्यात पूर्व सावधानता म्हणून सामानाची आवरा-आवर व दाखल रुग्णांना पर्यायी ठिकाणी हलविण्यासाठी सेवकांना नेहमीच दक्ष रहावे लागते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com