पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऊर्जा युवा प्रतिष्ठान आयोजित पोलीस भारती (Police Recruitment) स्वयंम मूल्यमापन (Self Assessment) व प्रशिक्षण शिबिरास (training camp) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा (students) उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. प्रतिष्ठान तर्फे सतत युथ फेस्टीव्हल (Youth Festival), पतंग महोत्सव (Kite Festival), करियर फेअर (Career Fair), महिला दहीहंडी, गणपती कार्यशाळा, निर्माल्य पिशवी, मराठी तारका, सावकरकर साहित्य संमेलन यासारखी उपक्रम राबविले जातात, अशी माहिती अध्यक्ष तथा मनपा माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Former Municipal Opposition Leader Ajay Boraste) यांनी दिली.

राज्य सरकारच्या (state government) मार्फत प्रथमच मोठ्या प्रमाणात सुमारे 18000 पदांची पोलीस भरती होत आहे. या भरतीत नाशिकमधील (nashik) जास्तीत जास्त विद्यार्थी पास होऊन पोलीस भारती (Police Recruitment) व्हावेत, यासाठी ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी जिल्ह्यातील युवकांसाठी स्वयंम मूल्यमापन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

शहरातील के. टी. एच. एम. महाविद्यालय (K. T. H. M. College) येथे आयोजित केलेल्या या प्रशिक्षण शिबिराची (training camp) सुरवात क्रिडा साहित्याचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, बाळासाहेब शिंदे, विलास शिंदे, माजी नगरसेवक डि. जी. सुर्यवंशी, सुदाम डेमसे, के. टी. एच. एम. कॉलेजचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, अनिल चौघुले, अश्वमेध करियर अकॅडमीचे संचालक मनीष बोरस्ते आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन शिबिरात (training camp) भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (students) येणाऱ्या पोलीस भारतीत नक्कीच फायदा होईल व नाशिक जिल्ह्यातील (nashik district) जास्तीत जास्त विद्यार्थी या पोलीस भरतीत भारती होतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख करंजकर यांनी व्यक्त केला. तर मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे (MVP general secretary Nitin Thackeray) यांनी बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर राबवलेले सर्वच उपक्रम हे वेगळे असल्याने विद्यार्थ्यांना व नाशिकरांना नेहमी फायदाच झाला असल्याचे सांगितले.

आज लेखी परीक्षा

उद्या रविवार (दि. 20) रोजी सकाळी 12 वाजता या मार्गदर्शन शिबिराची लेखी परीक्षा होणार असून आज झालेल्या शरारिक चाचणीत शिबिरात विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यातील कोणकोणते कागद प्रत्रांची कमतरता आहे. या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची उंची मोजून मुलांसाठी 1600 मीटर मुलींसाठी 800 मिटरची रनिंग चाचणी व गोळा फेक चाचणी घेण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com