
सप्तशृंगीगड | वार्ताहर Saptshrungi Gad
साडे तीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर असलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट मार्फत सुरू केलेली रुग्णवाहिका ग्रामस्थांसाठी व भाविकांसाठी विनाशुल्क सेवा देत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेची कमतरता असल्याकारणाने वेळेअभावी नागरीकांना सुविधा मिळणे अवघड असते मात्र श्री सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना सप्तशृंगी देवी संस्थांच्या वतीने रुग्णवाहिकेची चोवीस तास सेवा देण्यास नेहमी तत्पर आहे.