जि. प. सेवकांना पदोन्नती

जि. प. सेवकांना पदोन्नती

नाशिक । प्रतिनिधी

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सेवकांना प्रशासनाच्या वतीने पदोन्नती देण्यात आली आहे. वरिष्ठ सहाय्यकमधून कनिष्ठ लेखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

ज्या सेवकांना पदोन्नती मिळाली आहे ते सेवक पुढीलप्रमाणे - शारदा आचारी (पंचायत समिती, नाशिक), संदीप गावंडे (अर्थ विभाग), प्रियंका कुलकर्णी (अर्थ विभाग), प्रवीण रुईकर (पंचायत समिती, सिन्नर), शांताराम भामरे (पंचायत समिती, कळवण), चंद्रशेखर गवळी (पंचायत समिती, नांदगाव), नितीन खैरनार (पंचायत समिती, येवला).

जिल्हा परिषदेच्या पदोन्नती समितीप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी यांचे जिल्हा परिषद सेवकांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com