जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
नाशिक

जिल्हा परिषद सेवकांना खुशखबर

सेवकांना पदोन्नत्या

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

राज्य शासन करोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेले आहे.यामुळे प्रस्तावित नोकर भरती प्रक्रीयेलाही ब्रेक लागलेला आहे.यातच खाजगी क्षेत्रात सेवकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेतून मात्र सेवकांना दिलासा देणारे वृत्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विविध संवर्गातील सेवकांना पदोन्नत्या देत प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे.

जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील सेवकांना शुक्रवारी (दि.३१) पदोन्नत्या देण्यात आल्या. सन २०१५ च्या अनुकंपा यादीतील परिचर गट -ड गटातील १२ सेवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गट-क मध्ये पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत.

यामध्ये मंदा चौरे, मनोज ढोली, सुवर्णा सिन्नरकर, संदीप गायकर, सुनील साळुंके, युवराज सोनवणे, विनय निकम, प्रदीप ढाकणे, गोरक्षनाथ ताजणे, निलेश खैरणार, मयुर चव्हाण, रूपेश पहाडी या सेवकांना गट क मधील कंत्राटी ग्रामेसवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

वरिष्ठ सहाय्यक हेमंत मंडलिक, रविंद्र देसाई, नितीन पवार, राजेंद्र मोरे व संजय पाटे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. कनिष्ठ लेखाधिकारी पुनम भांबारे, विजय आघाव, सतिस गावित, संगीत पगार यांनी सहाय्यक लेखाधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. या शिवाय ९ परिचरांना वाहनचालक पदावर पदावर पदोन्नती मिळाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंद पिंगळे, ग्रामपंचायतीचे रविंद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रीया पार पडली.

Deshdoot
www.deshdoot.com