मनपा सेवकांना पदोन्नती

मनपा प्रशासनाकडून दिवाळी भेट
मनपा सेवकांना पदोन्नती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील सुमारे आठ वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न असलेल्या नाशिक महापालिकेतील NMC पदोन्नतीच्या Employees Promotionप्रश्न मार्गी लागला. नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील एकूण 530 सेवकांना पदोन्नतीची दिवाळी भेट महापालिका प्रशासनाने दिली.

पदोन्नतीची घोषणा झाल्यावर महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात सेवकांनी तसेच नाशिक महानगरपालिका म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरी करण्यात आला तसेच महापालिका आयुक्त कैलास जाधव, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 54 (1) मधील तरतुदीनुसार कर्मचारी निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या 5 जानेवारी 21 ते 6 सप्टेंबर 21 य याकाळात बैठका होऊन अंतिम यादी तयार करण्यात आली. उच्च न्यायालयातील पदोन्नतीच्या व दिव्यांग आरक्षणाच्या याचिकांच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 07 मे 2021 व 23 जुलै 2021 रोजी दिलेल्या निर्देशांनुसार कर्मचारी निवड समितीने पदोन्नतीच्या शिफारशी केल्या होत्या.

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कर्मचारी निवड समितीच्या बैठका घेऊन गट-अ मधील 16, गट-ब मधील 21 याप्रमाणे 37 तर गट क मधील 361 तर गट ड मधील 132 याप्रमाणे 493 व एकूण 530 सेवकांना पदोन्नती देण्याची मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान गट-अ व गट-ब चे याद्या महासभेच्या मान्यतेनंतर प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे दरम्यान आज पदोन्नतीची घोषणा करण्यात आली त्याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र आज दुपारपर्यंत महापालिकेच्या संकेतस्थळ सर्वर डाऊन असल्यामुळे सेवकांना ती पाहण्यासाठी अडचण येत होती.

नाशिक महापालिकेतील अधिकारी सेवक यांच्या पदोन्नतीचा प्रश्न म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने लावून धरला होता. संघटनेच्या प्रयत्नांना आज यश मिळाले, यामुळे जल्लोश साजरी करण्यात आले. 2013 पासून प्रलंबित असलेला पदोन्नती प्रश्न आज मार्गी लागला. प्रशासनाने कामगार सेनेला ऑक्टोबर रोजी यादी जाहीर करू असे आश्वासन दिले होते. म्हणून आज यादी जाहीर करण्यात आली.

यामुळे संघटनेच्यावतीने महापालिका मुख्यालय परिसरात भव्य जल्लोष करण्यात आला त्याची आतषबाजी करण्यात येऊन जयघोष करण्यात आला त्याप्रमाणे महापालिका आयुक्त व प्रशासन उपायुक्त यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्यासह पदाधिकारी व सेवक उपस्थित होते.

पदोन्नतीची घोषणा करून प्रशासनाने दिवाळी गिफ्ट दिले आहे. प्रशासनाचे संघटनेच्या वतीने आम्ही आभार मानतो. हा प्रस्ताव मागील आठ वर्षांपासून प्रलंबित होता. आम्ही याबाबत सतत पाठपुरावा केला. आम्हाला यश मिळाले आहे.

प्रवीण तिदमे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com