पोलीस दलात पदोन्नतीची प्रक्रिया सुरू

नाशिकच्या १५ अधिकाऱ्यांचा समावेश
पोलीस दलात पदोन्नतीची प्रक्रिया सुरू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police), सहायक पोलीस आयुक्तावर (Assistant Commissioner of Police) पदोन्नती (Promotion) देण्याची कार्यवाही सुरू केली असून, त्यासाठी १८० पोलीस निरीक्षकांची माहिती मागविली आहे.

जिल्ह्यातील पंधरा पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पोलीसप्रमुखांनी या निरीक्षकांची माहिती गृहखात्याला सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत . राज्यात सुमारे ३२५ पदे रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यासाठी १८० अधिकाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.

हे आहेत १५ अधिकारी

भारतकुमार सूर्यवंशी (शहर), संगिता निकम (शहर), राजेंद्रसिंह चंदेल (ग्रामीण), सुनील गोसावी (पोलीस अकादमी), मनोज करंजे (शहर), संजय सांगळे (शहर), भास्कर वायफळ (पोलीस अकादमी), अनिल कातकाडे (ग्रामीण), किशोर मोरे (शहर), दिनेश बर्डेकर (ग्रामीण) कमलाकर जाधव (शहर), श्रीपाद परोपकारी (शहर), संभाजी निंबाळकर (शहर), गुरुनाथ नायडू (शहर), यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com