जि.प.प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती

जि.प.प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेचे Zilla Parishad 206 प्राथमिक शिक्षक Primary Teachers व पदवीधर शिक्षकांना समुपदेशनाद्वारे मुख्याध्यापकपदावर पदोन्नती Promotion देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सेवेतील प्राथमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर व सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी आनंद पिंगळे यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केल्या होत्या.त्याअनुषंगाने जिल्हा परिषदत शाळेतील शिक्षकांना शिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली.

यावेळी दिव्यांग, महिला, आजाराने त्रस्त असणार्‍यांना आधी बोलावून पदोन्नती देण्यात आल्या. त्याचबरोबर पदोन्नतीची प्रक्रीया समुपदेशनाद्वारे राबविल्यामुळे पदोन्नती झालेल्या शिक्षकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी, स्वीय सहायक साईनाथ ठाकरे,

सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, अधीक्षक श्रीधर देवरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, शिक्षण विभागातील निलेश पाटोळे, संतोष झोले, राम बोडके, विश्वास कचरे, सलीम पटेल, अरुण भदाणे, सुनिल सोनवणे, विक्रम पिंगळे, अविनाश अहिरे,दिनेश नन्नावरे,दिनानाथ कुलकर्णी, इम्रान शेख यांसह अधिकारी व सेवकांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com