तोफखाना केंद्रीय विद्यालयात 'परीक्षा पे चर्चा'चे प्रक्षेपण

कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे सल्ले
तोफखाना केंद्रीय विद्यालयात 'परीक्षा पे चर्चा'चे  प्रक्षेपण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज सकाळी दिल्लीत बहुप्रतीक्षित 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम ( Pariksha Pe Charcha ) पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी प्रत्यक्ष हजारभर विद्यार्थ्यांशी संवाद (Interacted with students )साधला. तसेच विविध प्रसार माध्यमांद्वारे करोडो विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी अप्रत्यक्ष चर्चा विनिमय केला.

दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम (Talkatora Stadium- Delhi )मधून थेट प्रसारण झालेल्या या कार्यक्रमाचे शहरातील तोफखाना केंद्रीय विद्यालयाने (kendriya vidyalaya artillery center nashik )प्रक्षेपण केले. विद्यालयातील बाराशेहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जा, असा कानमंत्र पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा ही आयुष्यातील साधी गोष्ट असून पूर्ण तयारी केल्यानंतर परीक्षेला पत्र लिहून परीक्षेचीच परीक्षा घेण्याचा मजेशीर सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रक्षेपण संपन्न झाल्यानंतर प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. अभ्यासातील सातत्य आणि परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेले पंतप्रधानांचे मार्गदर्शन तुम्हा विद्यार्थ्यांना बूस्टर ठरणार असल्याचे ओलावत यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.