भाऊबीजेची भेट म्हणून गावात दारूबंदी करा

विराणेतील महिलांची पोलीसांना श्रीफळ पाठवत गांधीगिरी
भाऊबीजेची भेट म्हणून गावात दारूबंदी करा
File Photo

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मद्यपिंच्या धुडगुसाने त्रस्त झालेल्या महिलांनी विराणे गावात संपुर्णत: गावठीसह इतर दारू विक्रीस (Liquor sales) प्रतिबंध घालावा यासाठी वडनेर-खाकुर्डी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना भाऊबीज निमित्ताने श्रीफळ पाठवित गांधीगिरी करत दारूबंदीचे साकडे घातले.

तालुक्याच्या काठवन भागातील शेवटचे टोक असलेल्या विराणे गाव-परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती होते. तसेच बाहेरगावाहून येथे गावठी दारू देखील पोहचविली जाते. मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या दारूमुळे मद्यपींचे प्रमाण वाढून ते मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत असल्याने त्याचा त्रास ग्रामस्थांना विशेषत: महिलांना होत आहे.

दारूमुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले असल्याने सदर गावठी दारूबंदी संदर्भात अनेकदा निवेदने देऊन तसेच तक्रार करून देखील पोलीस प्रशासनातर्फे (police administration) लक्ष दिले जात नाही. किरकोळ कारवाई केली जात असल्याने दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहेत. यामुळे गावातच गावठी दारू निर्मिती करण्याचे प्रमाण देखील वाढले आहेत.

याचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गावातील महिलांनी एकत्रितपणे निवेदन (memorandum) तयार करत आपल्या स्वाक्षिरीनीशी भाऊबीज (bhaubeej) निमित्ताने संदिप देवरे यांच्यामार्फत श्रीफळ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकडे (Police officers and staff) पोहच करत दारूबंदी करत भाऊबीजेची अनोखी भेट मागितली आहे. करोना (corona) काळात ग्रामरक्षक दलाने दारूभट्टया उध्वस्त केल्या होत्या.

त्यावेळी काही दिवसांसाठी दारूबंदी झाली होती. दारू निर्मित्यांनी नंतर पुन्हा राजरोस दारू सुरू केली आहे. यामुळे वनक्षेत्राची देखील हानी होत आहे. याबाबत वन अधिकार्‍यांना देखील महिलांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर सह्या करणार्‍या महिलांनी आमच्या सहनशिलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये. अन्यथा सामूहिकरीत्या मोठे अंदोलन (Movement) करू अथवा उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com