सर्व समाजघटक एकत्र आल्यास देशाची प्रगती

विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे
सर्व समाजघटक एकत्र आल्यास देशाची प्रगती

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

कामगार, कामगार नेते, खेळाडू, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी असे समाजातील सर्व घटक एकत्र आल्यास देशाची प्रगती वेगाने होण्यास मदत मिळेल. दिवंगत माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांच्या स्मृती कार्यक्रमाला ( Prakash Borade Memorial Award ) माझ्यासारख्या प्रशासकीय अधिकार्‍याला निमंत्रित करणे ही चांगली बाब आहे. प्रकाश बोराडे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांनी विविध क्षेत्रात योगदान दिले. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येत असून हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game ) यांनी केले.

जेलरोडच्या भगवती लॉन्समध्ये प्रकाश बोराडे स्मृती पुरस्कार श्रमिक सन्मान व क्रीडा कौशल्य पुरस्कार वितरणप्रसंगी गमे बोलत होते. यावेळी श्रमिक सन्मान पुरस्कार उत्तम खांडबहाले व क्रीडा कौशल्य पुरस्कार सुनंदा पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गमे म्हणाले की, कोविड काळात सामाजिक एकोपा दाखविल्याने या संकटाला आपण समर्थपणे तोंड देऊन शकलो. प्रकाश बोराडे यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तीचे निधन कोविड काळात होणे ही दुःखद बाब आहे.

यावेळी प्रकाश बोराडे यांच्या पत्नी नगरसेविका रंजना बोराडे, राहुल बोराडे, युवा इंटक राष्ट्रीय अध्यक्ष संजय गाभा, आ. सरोज आहिरे, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, माजी महापौर नयना घोलप, सुनील बागुल, माजी आमदार जयंत जाधव, कोंडाजी आव्हाड, संजय भालेराव, राजाराम धनवटे, नगरेसवक पंडित आवारे, विशाल संगमनेरे, संतोष साळवे, रमेश धोंगडे, शरद मोरे, सुर्यकात लवटे, राहुल दिवे, राजू देसले, मनोहर कोरडे, दामोदर मानकर, अस्लम मणियार, ठाणे जिल्हा कबड्डी सेक्रेटरी मालोजी भोसले, केशव उगले, अमोल जाधव, रामभाऊ जगताप, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर तर संयोजन निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, उन्मेष गायधनी, अजित बने यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com