
नाशिक | प्रतिनिधी
मविप्र व यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने ना धों महानोर मानवंदना देण्याचा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता आय एम आर टी महाविद्यालय गंगापूर रोड येथे केले आहे.
नुकतेच पद्मश्री महाराष्ट्राचे रानकवी व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे विश्वस्त ना.धों. महानोर यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातून महानोर यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला ना.धो.महानोरांचा ग्रामीण जीवनावर असलेला अभ्यास आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या कविता व गीत महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला आपल्याशा वाटल्या त्याच भावलेल्या कविता व गीतांचा ना.धों महानोर मानवंदना कार्यक्रम या नभाने या भुईला दान द्यावे या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात नाशिक शहर जिल्हा परिसरातील नामवंत कवी व गीतकार सहभागी होणार आहे गायक रागिणी कामतीकर,अपर्णा देशपांडे,प्राजक्ता अत्रे गोसावी,आनंद अत्रे,हे गीत सादर करतील तर कवी रवींद्र मालूंजकर,लक्ष्मण महाडिक,संजय गोरडे,शंकर बोऱ्हाडे, तुकाराम धांडे, रवींद्र कांगणे,विष्णू थोरे, राजेंद्र सोमवंशी, भूषण मटकरी, हे कवितांच्या माध्यमातून ना.धों महानोर यांना अभिवादन करतील.
सदर कार्यक्रमात अमोल पाळेकर, प्रसाद पुराणिक, देवाशीष पाटील, अनिल धुमाळ, निलेश सोनवणे, पवन वंजारी यांचा सहभाग असणार आहे. जेष्ठ साहित्यीक भास्कर ढोके कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे,असे मविप्र नाशिक चे सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यशवंतराव चव्हाण सेंटर चे सचिव अशोक पिंगळे, कार्याध्यक्ष विक्रांत मते,अँड.राजेंद्र डोखळे,सुरेखा बोर्हाडे ,मनीष लोणारी ,समन्वयक भूषण काळे व्यवस्थापक गणेश ढगे, यांनी सांगितले आहे.