संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात नामदेव शिंपी पंच मंडळाच्यावतीने संत नामदेव विठ्ठल मंदिर, श्री संत नामदेव पथ जुने नाशिक काजीपुरा येथील नामदेव विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी नामदेव महाराज Saint Shiromani Namdev Maharaj यांच्या 751 व्या जयंती उत्सवानिमित्त सोमवारी (दि.15) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स. 6 वा. काकडा आरती, 7 वा. श्रींचा अभिषेक अतुल मानकर यांच्या हस्ते 9 वा. श्री संत नामदेव महिला भजनी मंडळाचा हरिपाठ, दुपारी 2 वा. परिसरातील महिला भजनी मंडळाचे भजन सायं. 4. वा. हरिपाठ, सायं. 6 वा. संत नामदेव बाणी गुरू ग्रंथसाहिब या शिख धर्मीय ग्रंथातील संत नामदेव महाराजांची पंजाबी भाषेतील गुरुवाणी पंचवटी गुरुद्वारा गुरुसिंग सभा, येथील ग्यानीजी, केवलसिंग सादर करणार आहे.

सायं. 7 वा. श्रींची महाआरती व महाप्रसाद रात्री 8 वा. वेणुनाद मोहन उपासनी यांचे बासरी वादन व भजन, रात्री 10 वा. हरिजागर विविध धार्मिक होणार आहे. समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com