बालकुमार मेळाव्यात भरगच्च कार्यक्रम; 4 डिसेंबरला उद्घाटन

बालकुमार मेळाव्यात भरगच्च कार्यक्रम; 4 डिसेंबरला उद्घाटन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 94th All India Marathi Literay Convention बालकुमार मेळाव्यात Balkumar Melva शनिवार (दि.4) पासून भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. उद्घाटन अभिनेतेे दिलीप प्रभावळकर Actor Dilip Prabhavalkar यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होईल. प्रमुख पाहुणे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, कौतिकराव ठाले-पाटील असतील.

जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, नितीन उपासनी, कु. शिवांजली पोरजे, सृष्टी पगारे, साक्षी पगारे, संजय करंजकर, संतोष हुदलीकर, सोमनाथ मुठाळ, योगिनी जोशी, गीता बागुल (बिरारी), चित्रा थोेरे, स्नेहल काळे आदी यात सहभागी होतील.

शनिवारी (दि.4) सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 पर्यंत : बालकवी / बालकथा अभिवाचन. सायंकाळी - 5.30 ते सायंकाळी 6 वा. - निमंत्रित बालकवींचे अभिवाचन. सूर्यकांत मालुसरे, संजय पेंडसे, अश्लेषा महाजन, विनोद सिनकर, किरण भावसार, संदीप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम, संतोष हुदलीकर सहभागी होतील.

रविवारी (दि.5) सकाळी 9 ते 10 ‘बालसाहित्य समजावून घेऊया’ या विषयावर चर्चा होईल. त्यात राजीव तांबे, रेणू गावस्कर, अर्चना कुडतरकर, प्रा. भास्कर बढे, संतोष हुदलीकर सहभागी होतील. सकाळी 10 ते 10.30 : मुलांशी गप्पागोष्टी (साहित्यिक प्रश्नोत्तरे), 10.30 ते 11 : जाणून घेऊ नवे शैक्षणिक धोरण. सहभाग : सचिन जोशी (अकोला विदर्भ). सचिन उषा विलास जोशी (नाशिक), सकाळी 11.30 ते 12.15 - खगोल ते भूगोल.सहभाग : राजीव तांबे, आनंद मास, दुपारी 12.15 ते 12.30 बालकथा अभिवाचन - रेणू गावस्कर, सुनील कुटे करतील.

दुपारी 1 ते 2.30 समारोप समारंभ, कौतिकराव ठाले-पाटील, प्रशांत पाटील, शेफाली भुजबळ, हेमंत टकले, दीपक करंजीकर, लीना बनसोड, नरेश महाजन, सचिन जोशी, सायली संजीव, सई मोराणकर, सचिन उषा विलास जोशी, प्रा. विलास औरंगाबादकर, नानासाहेब बोरस्ते, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर हाडे, उदयकुमार मुंगी, देवदत्त जोशी, प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, गिरीश नातू, अ‍ॅड. अभिजित बगदे, बी.जी.वाघ, वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. भानुदास शौचे, प्रा. डॉ. संगीता बाफना, डॉ. धर्माजी बोडके, डॉ. विनायक नेर्लीकर, सी. जे.गुजराथी, विनोद जाजू यांच्या उपस्थितीत होईल.

नाशिक पॅव्हेलियन!

नाशिकची खास ओळख दर्शवणारे एक नाशिक पॅव्हेलियन संमेलन स्थळावर आकार घेत आहे. या पॅव्हेलियनमध्ये नाशिकची पैठणी, खास कृषी उत्पादने, चविष्ट खाद्यपदार्थ आदी स्टॉल्सचा समावेश असेल. स्टॉल्स उपलब्ध आहेत, असे आयोजकांनी कळवले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com