नवरात्रोत्सवात एसटीला 'इतका' नफा

नवरात्रोत्सवात एसटीला 'इतका' नफा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावरील (Saptashringigad) आदिमाया भगवतीचा नवरात्रोत्सव (navaratrotsav) व कोजागिरी पौर्णिमा (kojagiri pournima) उत्सव काळात राज्य परिहवन महामंडळाच्या (State Transport Corporation) कळवण (kalwan) आगाराने दोन लाख 72 हजार 687 भाविक प्रवाशांची वाहतूक केली. यामुळे महामंडळाला 80 लाख 75 हजार 966 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सप्तशृंगीमातेचा वर्षभरात नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव हे दोन मोठे उत्सव होतात. या दोन यात्रादरम्यान नांदुरी (nanduri) ते सप्तशृंगीगड हा रस्ता खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात येतो. गेल्या दोन वर्षे करोेनामुळे (corona) मंदिर व उत्सव बंद होते. त्यामुळे एकट्या कळवण आगाराचेच सव्वा दोन ते अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. यंदा मात्र उत्सव झाले मात्र नांदुरी ते सप्तशृंगीगड मार्गावर खाजगी वाहनांना बंदी करण्यात आली होती.

त्यामुळे राज्य परिहवन महामंडळाच्या बसव्दारेच भाविकांना जावे लागल्याने महामंडळाचा फायदा झाला. यात नाशिक (nashik) विभागातील कळवण आगाराने 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या नवरात्रोत्सवात 19 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान झालेल्या कोजागिरी पौर्णिमा उत्सव व कावडयात्रेत कळवण आगाराने नांदुरी ते सप्तशृंगीगड दरम्यान सरासरी 55 जादा बसचे नियोजन केले.

नवरात्रोत्सवात 9 हजार 479 बस फेर्‍याव्दारे 1 लाख 93 हजार 643 प्रवाशांची तर कोजागिरी उत्सवात 2 हजार 819 फेर्‍याव्दारे 79 हजार 44 प्रवाशी याप्रमाणे दोन्ही उत्सवात 2 लाख 72 हजार 687 भाविकांची वाहतूक केली आहे. यात कळवण आगारास 80 लाख 75 हजार 966 रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती कळवण आगाराचे आगारप्रमुख हेमंत पगार, वाहतूक नियंत्रक सुरेश पवार, लिपीक विजय दळवी यांनी दिली आहे.

बसस्थानकाची प्रतीक्षा

सप्तशृंगीगडावरील नवरात्रोत्सव व चैत्रोत्सवात राज्य परिहवन महामंडळाला भाविकांच्या वाहतूकीतून वर्षभरात सुमारे चार ते पाच कोटीचे उत्पन्न मिळते. उन्हाळी सुट्टी, दिवाळी व इतर उत्सवाच्या दरम्यानही भाविकांची बसव्दारे वाहतूक केली जाते. दरवर्षी करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणार्‍या सप्तशृंगीगडास राज्य परिवहन महामंडळाने मात्र उपेक्षित ठेवले आहे. गडावर बसस्थानकच नसून भाविकांना ऊन, वारा, पावसात ताटकळत उभे राहुन गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com