प्राध्यापकांनी ज्ञानपूजक बनून विद्यार्थी घडवावेत

मविप्र सरचिटणीस निलिमा पवार
प्राध्यापकांनी ज्ञानपूजक बनून विद्यार्थी घडवावेत

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

ज्ञानदेवांनी महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण केली.ज्ञान घेणे,ज्ञान देणे, ज्ञान पूजक बनणे,सतत चांगले काम करीत राहणे ही आपल्या संस्कृतीची प्रमुख शिकवण आहे,मला अजूनही काही नवीन शिकण्याचा मोह आवरत नाही,या दीड वर्षात जग खूप बदलले आहे, आपण आपली गुणवत्ता सतत वाढविली पाहिजे,अजूनही खेडोपाडी बऱ्याच शाळा ( Schools ) मारुतीमंदिरात भरतात, जागा महाग असल्याने मंदिरात शाळा भरविणे शिक्षणप्रक्रियेत गरजेचे ठरले आहे.आदिवासी भागातील हुशार विद्यार्थी ( ( Smart students from tribal areas ) निवडून त्यांना लोकसेवा आयोग, स्पर्धा परीक्षा द्यायला प्रवृत्त करा.नवनवीन संशोधन करून पेटंट मिळवा,माणूस घडविण्यासाठी निरंतर अभ्यास करणे हेच खरे कार्य आहे,असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस निलिमा पवार ( MVP general secretary Nilima Pawar ) यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि यशवन्तराव चव्हाण महाराष्ट्र् मुक्त विद्यापीठ केंद्र आयोजित पदवीदान सोहळ्याचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सरचिटणीस निलिमा पवार बोलत होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संचालक मा. सचिनजी पिंगळे,यशवन्तराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू . डॉ. ई. वायुनन्दन,श्रीरामशक्तीपीठ आश्रम श्रीक्षेत्र चाकोरे बेझे येथील .स्वामी महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज.य.च.म.मु.विद्यापीठाचेमा.डॉ. प्रकाश देशमुख,प्राचार्य डॉ.ए.के.शिंदेआदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू .ई. वायुनंदन पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्याचा गौरव करतांना म्हणाले की,ग्रामीण भागातील लोकच या विद्यापीठातुन चांगले शिक्षण घेऊ शकतात,मविप्र संस्थेने या विद्यापीठाला पूर्वीपासूनच उत्तम सहकार्य केले आहे.आमचे शिक्षण म्हणजे ज्यांना पहिली संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी ही दुसरी संधी आहे.आमचे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी केंद्रे सुरू आहेत,मुख्यमंत्री निधीला आम्ही दहा करोड रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती यांनीही आपल्या मनोगतात ज्ञान,शिक्षण प्रक्रिया,अध्यात्म,ईश्वराचे खरे रूप ज्ञानदानात व समाजसेवेतच आहे,हे प्रत्येकाने समजून घ्यावे,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए के शिंदे यांनी केले व सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.

याप्रसंगी सुवर्णपदक विजेते .रवींद्र नन्नावरे,सारिका वाघ, आदित्य जाधव,आदींनी आपल्या यशाबद्दलचे सुंदर अनुभव कथन केले.या कार्यक्रमात वरील विजेत्यांसोबतच सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज,सुदर्शनानंद सरस्वती महाराज,श्रीनाथानंद सरस्वती महाराज,डॉ माधव खालकर,डॉ मिलिंद थोरात,श्रीअमोल कोल्हे,सौ वैशाली थेटे, पोपट जाधव यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीता पुणतांबेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन संयोजक प्रा संदीप गोसावी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व सेवकवृंदाने परिश्रम घेतले,तसेच सर्वजण उपस्थित राहिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com