
नाशिक | Nashik
येथील नाशिक एज्युकेशन सोसायटीचे (Nashik Education Society) अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर (Prof. Surykant Rahalkar) यांचे आज बुधवार (दि. १३ सप्टेंबर) रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन (Passed Away) झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. रहाळकर यांनी प्राध्यापक म्हणून नाशिक (Nashik) येथील बी.वाय.के महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे काम केले होते...
प्रा.सूर्यकांत रहाळकर हे व्यावसायिक देखील होते. त्यांनी बांधकाम व्यवसायात (Construction Business) अनेक प्रकल्प हाती घेतले होते. तसेच धार्मिक कार्यात म्हणजेच मंदिर बांधणे, समाधी बांधणे यात ते नेहमी अग्रेसर होते. प्रा.सूर्यकांत रहाळकर हे निर्वाण इंडस्ट्री आणि रहाळकर सोडा फॅक्टरीचे देखील संचालक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले असून त्यांचा विद्यार्थी (Students) परिवार खूप मोठा आहे.
दरम्यान, प्रा.सूर्यकांत रहाळकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ४ ते ६ वाजेपर्यंत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात (Pethe Vidyalaya) ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रहाळकर यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.