राजापूर । वार्ताहर

येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावातील पाणी हे सौरऊर्जा पंपच्या सहाय्याने उचलून वडपाटी पाझर तलावजवळ एक बिगा ते एकरभर जागेत वन विभागाने हरिण काळवीट, वन्य प्राण्यांची भूक भागेल, यासाठी गवती कुरण रोपवाटिका निर्मिती केली आहे.

ममदापूर संवर्धन राखीवमध्ये हेमाटा, पोवण्या, मारवेल अंजन, दीनानाथ धामण, दशरथ, डोंगरी इत्यादी प्रकारचे गवताच्या प्रजाती तयार केल्या आहेत. या गवताची लागवड पावसाळ्यात केली जाणार आहे.

वन विभागाच्या वन जंगलात या गवताची लागवड करून हरणांची अन्नासाठी वनवण थांबणार आहे. अशाचप्रकारे ममदापूर संवर्धन मध्येही लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे पक्ष्यांची ही वाढ होण्याची शक्यता आहे.

गवती कुरणाविषयी मार्गदर्शन डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, वनपाल एम. बी. पवार, वनरक्षक पी. एस. पाटील, जी. आर. हरगावकर, ममदापूर वन बीटचे ज्ञानेशवर वाघ, पोपट वाघ, हे वन कर्मचारी या रोपवाटीकेची देखभाल वन मजूर राजापूर मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे हे गवती कुरण यशस्वी होण्यास विशेष प्रयत्न करीत आहे.