रानभाज्या महोत्सवातून उत्पादक ते ग्राहक साखळी - विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक । Nashik

रानभाज्या महोत्सवातून (Ranbhajya Festival) उत्पादक ते ग्राहक साखळी तयार होत असून या माध्यमातून आदिवासी भागातील (Tribal areas) संस्कृती समोर आणत ती जतन करण्याचे महत्वाचे काम होत आहे. या महोत्सवातून विविध रानभाज्यांबरोबर महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या विविध वस्तु एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत.या माध्यमातून आदिवासी भागातील स्वयंसहायता गटांना उत्पन तर मिळणार आहेच शिवाय रानभाज्यांचे संवर्धनही होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांनी केले...

आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी, म्हणून सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilla Parishad) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने नाशिक पंचायत समितीच्या (Nashik Panchayat Samiti) आवारात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे बुधवारी (दि.२७) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लीना बनसोड (Lena Bansod) आयुक्त (सेवा हमी कायदा) चित्रा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी महेश बच्छाव, प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रविंद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त गमे म्हणाले,नैसर्गिक पद्धतीने उगविणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून रानभाज्या महात्सवातून त्यांची शहरातील नागरिकांना ओळख होणार आहे. नाशिक शहरातील नागरिकांनी या महात्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तसेच प्रास्ताविकात बनसोड यांनी रानभाज्या महोत्सवाची माहिती देताना सलग तिस-या वर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दर शुक्रवारी १० ते २ या वेळेत नाशिककरांना रानभाज्या खरेदी करता येणार आहेत. या महोत्सवात प्रत्येक तालुक्यातील बचत गटांना सहभागी करुन घेण्यात आले असून ३४ गटांनी यात सहभाग नोंदविला आहे. आदिवासी बांधवांना व महिला गटांना आपल्या वस्तु विक्रीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तीन महिने चालणाऱ्या या महोत्सवात रानभाज्यांबरोबर बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तुही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून नाशिक शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उमेद (एम एस आर एल एम) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (State Rural Jeevonnati Abhiyan) रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने उमेद – अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत पावसाळयातील रानभाज्या विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी दिली. रानभाज्या महोत्सव यशस्वी करण्यासाठी उमेद (एम एस आर एल एम) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

रासायनिक खते आणि विषारी औषधांनी युक्त भाज्यांच्या भडिमारामुळे जगभरातील लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण-आदिवासी भागात नैर्सर्गिकरित्या येणाऱ्या रानभाज्यांचे महत्व लक्षात घेणे अत्यावश्यक बनले आहे. या रानभाज्या आरोग्यासाठी पोषक असून या महोत्सवात आदिवासी भगिनींनी रानातून गोळा केलेल्या जीवनसत्व, लोह, कॅल्शियमनी भरपूर युक्त भाज्या, फळे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.अनेक पौष्टीक भाज्या, त्यांची बनवण्याची पद्धत आणि उपलब्धतेचे ठिकाण ही सर्व माहिती या महोत्सवात देण्यात येत आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com