येवल्यात राधाकृष्ण देवतेची मिरवणूक

येवल्यात राधाकृष्ण देवतेची मिरवणूक

येवला | प्रतिनिधी | Yeola

येथे राधाअष्टमी (Radha Ashtami) निमित्ताने राधाकृष्ण देवतेची शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेऊन, शहरातून मिरवणूक काढण्यात आली. उत्सव टिळक मैदाना वरील मंदिरात मोठ्या आनंदाने साजरा करण्यांत आला...

गुजरात (Gujrat) राज्यातून सुमारे ४०० वर्षापूर्वी लेवा पाटीदार समाज येथे स्थायिक झाला आहे. मुख्य शेती (Agriculture) व्यवसाय करणारा हा समाज राधेकृष्ण पूजक आहे. त्यामुळे दरवर्षी राधाअष्टमी उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पूर्वीपार ही परंपरा जुन्या मंदिरातून चालत असे. यानंतर शेठ गंगाराम छबिलदास या पिढीने साकारलेल्या मंदिरातून राधावल्लभाची पालखी मिरवणुक काढण्याची परंपरा जुनी असून प्रथा अखंडपणे सुरु आहे.

मिरवणुकीच्या अग्रभागी चौघडा, घोडा गाडी येवल्याचे प्रसिद्ध वाद्य हलकडी,बँड तसेच विविध भगवे ध्वज मिरवणुकीची शोभा वाढवित होते. रेशमी पितांबर, पाठीवर भरजरीत विणकाम केलेले रुमाल धारण केलेल युवकांनी राधावल्लभाची चांदीची पालखी खांद्यावर घेतली होती.

राधावल्लभ नावाचा जयघोष करत पालखीची समाज बांधवाच्या अंगणात येताच भगिनीनी मनोभावे पुजा केली. मिरवणूक मंदिरात येताच राधाकृष्ण मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली.

पालखी मिरवणुकीत सरपंच यतीन पटेल, उपसरपंच मुकूल पटेल, खजीनदार चमन पटेल, भुषण पटेल, मनोज पटेल ,शैलेश देसाई, नवीन देसाई, सत्यप्रकाश पटेल यांच्यासह प्रणय गुजराथी, उद्योगपती सुशीलचंद्र गुजराथी, संजय पटेल, अरूण गुजराथी, मयूर पटेल, डॉ. राजेश पटेल, सुजोत पटेल, पियुष पटेल, मयूर गुजराथी, अमित पटेल, विकास पटेल, कल्पेश पटेल, निखिल पटेल, श्रीपाद पटेल, अनिरुद्ध पटेल, सागर पटेल, तरंग गुजराथी, मनीष पटेल, अमित पटेल, चैतन्य पटेल, पार्थ पटेल उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com