वारकरी भवनात विठ्ठलमूर्तीची प्राणप्रतिष्ठा

वारकरी भवनात विठ्ठलमूर्तीची प्राणप्रतिष्ठा

सिन्नर | वार्ताहर | Sinnar

शहराच्या विजयनगर येथे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर वारकरी भवनात (Ahilyabai Holkar Warkari Bhavan) साकारण्यात आलेल्या मंदिरातील विठ्ठल (Lord Vitthal) मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली....

सकाळी मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यानंतर विठ्ठल मूर्तीला रथात ठेवत विजयनगर परिसरातून (Vijaynagar Area) शोभायात्रा काढण्यात आली. रथाच्या स्वागतासाठी परिसरातील महिलांनी जय्यत तयारी केली होती. प्रत्येक रत्यावर, प्रत्येक घरासमोर महिलांकडून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

रथ जात असताना भाविकांकडून मूर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. आज (दि.1) सकाळी 9 वाजता मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून सकाळी 10 वाजता रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे.

यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर सेवा समिती,अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष कैलास महाराज तांबे (Kailas Maharaj Tambe) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com