नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी प्रक्रिया गतिमान
USER

नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी प्रक्रिया गतिमान

22 गावांमधील जमिन संपादीत करणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक - पुणे रेल्वे मार्गासाठी Nashik- Pune Railway जिल्ह्यातील 22 गावांमधील जमिन संपादीत करण्यात येणार आहे.जमिनीचे दर ठरविण्याची प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू होणार असून थेट खरेदीने या जमिनी घेण्यात येणार आहेत.यापैकी 20 गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.

नाशिक - पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा रेल्वे मार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. परंतू हा रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी आता हालचाली गतीमान झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी या रेल्वेमार्गाच्या कामाचा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधील 22 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. त्यासाठी 286 हेक्टर जमिन संपादीत करण्यात येणार आहे.

यापैकी बेलतगव्हाण आणि विहितगाव ही दोन गावे वगळता उर्वरीत 20 गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रियादेखील पूर्ण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी दिली. या जमिनी थेट खरेदीने संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास दीड- दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वे मार्गासाठी जमिनी देण्याबाबत काही कौटुंबिक वाद आहेत. परंतू हे प्रमाण कमी आहे. अशा जमिनधारक कुटुंबांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला जाईल. जमिन देण्यास तयार असलेल्या शेतकर्‍यांची जमीन प्राधान्याने घेणार आहे.

Related Stories

No stories found.