'रिलायन्स लाइफ सायन्सेस’ उद्योग उभारणीची प्रक्रिया गतिमान

'रिलायन्स लाइफ सायन्सेस’ उद्योग उभारणीची प्रक्रिया गतिमान
देशदूत न्यूज अपडेट

सातपूर | Satpur

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) तळेगाव- अक्राळे या एमआयडीसीत (Akrale MIDC) २१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार्‍या २ हजार ५०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणार्‍या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ’रिलायन्स लाइफ सायन्सेस’ (Reliance Industry) कंपनीच्या भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे...

एमआयडीसीने (MIDC) रिलायन्सला १६० कोटी रुपयांमध्ये १६१ एकर जागा सदर कंपनीला दिली आहे. त्यापैकी २५ टक्के रक्कम म्हणजे ४० कोटी रुपयांची अनामत रिलायन्सच्या व्यवस्थापनाने एमआयडीसीकडे जमा केली आहे. उर्वरित रक्कम जमा केल्यानंतर साधारण महिनाभरात रिलायन्सला वितरित जागा १६१ एकर व्यवहाराची एकूण रक्कम १६० कोटींचा भरणा केल्यानंतर कंपनीला या जागेचा ताबा दिला जाण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात रिलायन्स समूहाच्या रिलायन्स लाइफ सायन्सेस’ या उपकंपनीने नाशिकमध्ये (Nashik) लसनिर्मिती प्रकल्प (Vaccine Production Project) उभारण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी एमआयडीसीच्या दिंडोरी तळेगाव-अक्राळे औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १६२ एकर जागेच्या हस्तांतरणासाठीच्या पुढील व्यवहाराला गती देण्यात आली आहे.

ही जागा एकूण १६० कोटी रुपयांमध्ये कंपनीला देण्यात आली. व्यवहारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एकूण रकमेच्या २५ टक्के अनामत रक्कम एमआयडीसीकडे जमा करणे आवश्यक होते. त्यानुसार रिलायन्स लाइफ सायन्सेस’ कंपनीच्या वतीने अनामत ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

औषध निर्मिती क्षेत्रातील (Pharmaceutical manufacturing sector) संशोधन क्षमता वाढणारा ’रिलायन्स लाइफ सायन्सेस’ (Reliance Life Sciences) हा प्रकल्प असून, या उद्योगात बायो थेराप्युटिक्स, प्लाइमा प्रोटिन्स, बायोसिमिलर्स व नॉव्हेल प्रोटिन्स, फार्मास्युटिकल्स लेटर जनरेशन, ऑन्कॉलॉजी जेनेरिक्स, क्लिनिकल रिसर्च सर्व्हिसेस, रिजनरेटिव्ह मेडिसीन स्टेम सेल्स थेरपीज व मॉलेक्युलर मेडिसिन या औषध निर्मितीत संशोधन व विकास करण्यासाठी या प्रकल्पात काम केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com