आधार कार्डवरचा पत्ता बदलायचा आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

आधार कार्डवरचा पत्ता बदलायचा आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

नाशिक | Nashik

UIDAI नं काही दिवसांपूर्वी ट्वीट करत आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासंदर्भातील माहिती दिली. ट्वीटमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ओळखपत्राचा आणि पत्त्याच्या पुरावा सादर केल्याशिवाय पत्ता बदलता येणार नाही...

त्यामुळे पत्ता बदलण्यापूर्वी पत्त्याच्या पुरावा सादर करावा लागणार. जाणून घेऊया आधार कार्डावरील पत्ता बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया.

ॲानलाइन अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वर जा. Proceed To Update Aadhar Card यावर क्लिक करा. त्यानंतर आधारकार्डवरील (Aadhar card) 12 अंकी नंबर तिथे प्रविष्ट करा. सुरक्षेसाठी समोर आलेला कॅप्चा कोड नीट टाईप करा.

नंतर मोबाईल नंबर (Mobile Number) टाकून सेंड ओटीपीचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून आलेला कोड तिथे टाकून एन्टर करा. दिलेला मोबाईल नंबर हा आधारकार्डला लिंक असावा. लॉग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल. तिथे दिलेल्या 32 ओळखपत्रांपैकी कोणतंही एक सिलेक्ट करा आणि त्याची स्कॅन कॉपी (Scan Copy) अपलोड करुन सबमिट करा

ऑफलाईन अर्ज कसा कराल?

आपल्या जवळच्या आधारकार्ड केंद्रावर जा आणि आधारकार्ड अपडेट करण्यासाठीच्या अर्जाचा फॉर्म भरा.

त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी (Verification) तुम्हाला बायोमेट्रिक्स द्यावं लागेल. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. त्यावर असलेला रिक्वेस्ट नंबर (URN) वरुन तुम्ही तुमच्या आधार कार्डाचं स्टेटस ट्रॅक करु शकता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com