NDCC Bank : बड्या सभासदांकडे थकबाकी; जिल्हा बँकेने उचलले 'हे' मोठे पाऊल

NDCC Bank : बड्या सभासदांकडे थकबाकी; जिल्हा बँकेने उचलले 'हे' मोठे पाऊल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा बँकेचे (NDCC Bank) मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर वसुलीची कार्यवाही बँकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. यामध्ये चांदवड तालुक्यातील १३ सभासद, येवला तालुक्यातील १५, कळवण 15, निफाड 11 व दिंडोरी तालुक्यातील 12 अशा एकूण ६६ सभासदांचा समावेश आहे...

बँकेचा सन २०२३-२४ कर्ज वसुली हंगाम सुरु आहे. बँकेची जिल्ह्यातील ५५ हजार ७३७ थकबाकीदार सभासदांकडे २३६५ कोटीचे (मुद्दल +व्याज ) शेती कर्ज थकलेले आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली व बँकेच्या खातेदारांना ठेवींची/खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्धत व्हावी, यासाठी बँकेने वसुलीबाबत आढावा बैठक नुकतीच घेतली.

NDCC Bank : बड्या सभासदांकडे थकबाकी; जिल्हा बँकेने उचलले 'हे' मोठे पाऊल
Misal Pav : झणझणीत 'मिसळ पाव'चा जगभरात डंका; 'या' यादीत पटकावला ११ वा नंबर

यात जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१  नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

NDCC Bank : बड्या सभासदांकडे थकबाकी; जिल्हा बँकेने उचलले 'हे' मोठे पाऊल
गुलाबजामवरून लग्नात राडा; मांडवातच नातेवाईक आणि केटरर्स भिडले

त्यानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी सहकारी संस्था अधीनियम १९६० अन्वये योग्य त्या कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नाही, अशा  सन २०१६ पूर्वीच्या मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून  १० लाखावरील थकबाकीदार सभासदांचे टप्प्याटप्प्याने लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com