एमआयडीसीच्या गाळे प्रकल्पाला समस्यांचा घेरा

सुविधा देण्यास एमआयडीसी, मनपाची टाळाटाळ
एमआयडीसीच्या गाळे प्रकल्पाला समस्यांचा घेरा
USER

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

एमआयडीसीच्या प्लॉट नंबर 28 वरील (MIDC Plot No. 28) गाळे प्रकल्पातील उद्योजक एमआयडीसी (MIDC) व मनपा (Nashik Municipal Corporation) या दोन संस्थांच्या टोलवाटोलवीमुळे त्रस्त झाले आहेत. दोन्ही यंत्रणा सेवा सुविधा पुरवत नसल्याने उद्योजकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होत आहे...

1995 साली एमआयडीसीने चार इमारतींचे प्रकल्प उभारले होते. गाळे हस्तांतरित करताना सोसायटी उभारून देणे गरजेचे होते तसे केले गेले नाही.

या चारही इमारतींलगत वाहनांच्या पार्किंगसाठी प्लॉट शिल्लक ठेवण्यात आला होता. बांधकामाच्या सात-आठ वर्षानंतर तेथेही अतिरिक्त एफएसआय शिल्लक असल्याचे कारण सांगून इमारत उभी करण्यात आली त्यामुळे पुन्हा पार्किंगचा (Parking) प्रश्‍न गंभीर झाला.

मागील पंचवीस वर्षांपासून इमारत पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी वाट पाहत आहे. मुख्य प्रवर्तक म्हणून एमायडीसीनेच हे काम करणे अपेक्षित आहे. मात्र एमआयडीसीने इमारतीचे गाळे हस्तांतरित केल्यानंतर इमारतीवर देखभाल दुरुस्तीसाठी काहीही खर्च केलेला नाही.

सोसायटीमध्ये जाणारे रस्ते मातीचे आहेत, घंटागाडी गाळ्यांजवळ येत नाही. डीपीची सुरक्षा व्यवस्था काही नसल्याने उघडी पडलेली आहे, भूमिगत गटार योजनेला जोडण्यासाठी कोणतीही पाईप योजना लावलेली नाही,

गाळ्यांमध्ये जाण्या-येण्यासाठी एकच जिना असून तो धोकादायक बनला आहे. पाण्याची पाईपलाईन छतावर टाकलेली असल्याने कायम गरम पाणी येत असते. अशा एक ना अनेक समस्या या सोसायटीमध्ये आहेत.

या समस्यांबाबत एमआयडीसीला सातत्याने संपर्क साधल्यानंतर ही फारसा प्रतिसाद मिळत नाही. मनपा प्रशासनाकडे घंटागाडी ड्रेनेज लाईन स्वच्छतेसाठी पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही.

गाळे प्रकल्प भोवती घाणीचे साम्राज्य आहे. रस्ते चिखलाचे झाले आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा नाही अशा एक ना अनेक समस्यांच्या वातावरणात व्यवसाय सुरु आहेत. या प्रश्नाची सोडवणूक कोण करणार असाच सवाल गाळेधारकांनी उपस्थित केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com