गणेशोत्सवात समस्या कायम; उत्सव समिती पदाधिकार्‍यांचे आंदोलन

गणेशोत्सवात समस्या कायम; उत्सव समिती पदाधिकार्‍यांचे आंदोलन

मालेगाव । दि. 5 प्रतिनिधी | Malegaon

शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे (potholes), मोकाट जनावरे (animals) तसेच श्रीमुर्तीची स्थापना (gaensh idol) केलेल्या मंडपातून तुंबलेल्या गटारींचे वाहत असलेले पाणी आदी विविध समस्यांनी गणेशभक्त व सार्वजनिक मंडळे त्रस्त झाली आहेत.

सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन मनपा अधिकारी बैठकीत देतात मात्र नंतर काहीच उपाययोजना करत नसल्याने या समस्यांचा त्रास गणेशभक्तांना होत असल्याने संतप्त झालेल्या मध्यवर्ती गणेशोत्सव समितीतर्फे आज श्रीमुर्ती हातात घेत सरदार चौकात स्वच्छतेसाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले.

गणेशोत्सव समितीच्या (Ganeshotsav Committee) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीमुर्ती हातात घेत रस्त्यावर उतरून सरदार चौकात आंदोलनास (agitation) प्रारंभ करताच मनपा यंत्रणेस खडबडून जाग येते उपायुक्त गणेश गिरी, शहर अभियंता कैलास बच्छाव,

सहाय्यक आयुक्त सचिन महाले, अभियंता जयपाल त्रिभुवन, चौरे आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष शाम गवळी, माजी अध्यक्ष रामदास बोरसे, नेविलकुमार तिवारी, कैलास तिसगे, अर्जुन भाटी, जितेंद्र भुसे, भरत पाटील, अजय जगताप, मच्छिंद्र शिर्के, दीपक पवार, गोपाळ अहिरे, विकी पाटील, चेतन आसेरी आदी संतप्त आंदोलकांनी यावेळी समस्यांचा पाढाच अधिकार्‍यांपुढे मांडला. उत्सव समितीचे अध्यक्ष शाम गवळी, माजी अध्यक्ष रामदास बोरसे यांनी गणेशभक्तांसह सार्वजनिक मंडळे मनपा यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांनी त्रस्त झाली असल्याचे सांगत आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या (ganeshotsav) पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे (potholes) दुरूस्त करण्याचे काम केले जात आहे. मात्र मिरवणूक मार्गावरील (Procession route) बहुतांश खड्डे जैसे थे असल्याने या मार्गावरून मिरवणुकीचे रथ (Processional Chariots) गेल्यास अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चांगले रस्ते सोडा किमान खड्डे तरी नीट बुजवावेत तसेच मोकाट जनावरांवर त्वरीत पायबंद घालण्यासह मिरवणूक मार्गावरील सर्व अतिक्रमणे त्वरीत काढण्यात यावीत. तुंबलेल्या गटारी उपसण्यात येवून प्रवाहीत करण्यात याव्यात तसेच रस्त्यावरील घाणीचे ढिग उचलण्यात यावे. किमान गणेशोत्सव काळात तरी रस्त्यांवर झाडू मारण्यात यावी, अशी मागणी यावेळी बोरसे व गवळी यांनी केली.

सरदार चौकात फुटलेली जलवाहिनी तसेच तुंबलेल्या गटारींमुळे घाणपाणी जयभवानी गणेश मंडळाच्या मंडपातून वाहत आहे. या भागात त्वरीत जलवाहिनी दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांतर्फे यावेळी केली गेली. या समस्यांची मनपा उपायुक्तांसह अधिकार्‍यांनी त्वरीत दखल घेत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामास प्रारंभ केला.

रस्त्यावरील खड्डे 24 तासात बुजवले जातील तसेच मोकाट जनावरे पकडण्यात येवून मिरवणूक मार्गावरील सर्व अतिक्रमणे यंत्रणेतर्फे काढले जातील, असे आश्वासन उपायुक्त गिरी, सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी दिल्यानंतर संतप्त पदाधिकार्‍यांतर्फे आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात संतोष गवळी, अश्विन पाटील, पवन पाटील, सतिष गाढे, राम गुप्ता, गणेश पाटील, प्रतिक पाटील, अक्षय महाजन आदींसह मोठ्या संख्येने समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com