एकलहरे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींचे प्रश्न लागणार मार्गी

एकलहरे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींचे प्रश्न लागणार मार्गी

देवळाली कॅम्प | Devlali Camp

वीज क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी देवळालीच्या (Devlali Camp) आ. सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) व चंद्रपूरच्या आ. प्रतिभा धानोरकर यांनी मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister Prajakt Tanpure) यांचेकडे बैठक घेतली असता या प्रश्नी सरकार सकारात्मक असून लवकरच चांगला निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित बैठकीस वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम जाधव, भीमाशंकर महंता व महानिर्मितीचे अनंता कोर उपस्थित होते.

या बैठकीत लवकरच कामगार भरती (Workers Recruitment) प्रक्रिया राबवावी. प्रकल्पग्रस्त, प्रकल्प कुशल, प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक व ट्रेनींगच्या आधारावर प्रश्नपत्रिका काढण्याच्या सुचना परीक्षा घेणाऱ्या संस्थेला देण्यात याव्यात.

पाच वर्षे प्रशिक्षण पूर्ण झालेल्याना ट्रेड टेस्ट घेऊन तंत्रज्ञाची भरती करण्यात यावी. ज्या प्रशिक्षणार्थींचे वय ४५ वर्षे पूर्ण झालेले आहे व जे प्रशिक्षणार्थी अकुशल आहे. अशांना चतुर्थ श्रेणी अंतर्गत सेवेत सामावुन घेण्यात यावे अशा मागण्या बाबत आ. आहिरेंनी बैठकीत सूचना केल्या. तसेच प्रशिक्षणार्थीना कौटुंबिक आरोग्य विमा संरक्षण (Health insurance protection) देण्याचा मुद्दा देखील प्राधान्यानेने मांडला.

अपघात झाल्यास विमाकवच नसल्याने त्या प्रशिक्षणार्थीवर आर्थिक संकट कोसळते. यावेळी ना. तनपुरे यांनी मुख्य अभियंत्यांना अशा अपघाती प्रशिक्षणार्थींना तात्काळ मदत करण्याच्या सुचना केल्या.तसेच लवकरच ऊर्जा मंत्र्यांच्या समवेत इतर मागण्यां बाबद चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

या बैठकीस कोटमगाव (Kotamgoan) सरपंच बाळासाहेब म्हस्के, सोसायटी चेअरमन पोपटराव म्हस्के, रामकृष्ण म्हस्के, शंकर म्हस्के, श्रीपत म्हस्के, प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीचे प्रतिनिधी संदीप म्हस्के, किरण पेखळे, समाधान लोणे, मनोज नेहे, राहुल सहाणे, अजिंक्य बोराडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com