समस्या दिंडोरीची: प्रशिक्षण केंद्र की प्रेमीयुगुल, मद्यपींचा अड्डा

समस्या दिंडोरीची: प्रशिक्षण केंद्र की प्रेमीयुगुल, मद्यपींचा अड्डा

दिंडोरी । संदिप गुंजाळ | Dindori

आरोग्य (health) म्हटले की सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यासाठी कोट्यावधींच्या निधीची (fund) तरतुद केली जाते. परंतू योग्य नियोजन नसल्याने तो निधी वाया जातो की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

अशीच काहींसी प्रचिती महाराष्ट्र शासनाच्या (state government) वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Campaign) परिचारीका प्रशिक्षण केंद्राकडे (Nurse Training Center) बघितल्यावर येते. कोट्यावधींचा निधी खर्च करुन दिमादार इमारत येथे उभी राहिली असतांना ही आज बेवारस स्थितीत पडून असल्याने ते प्रशिक्षण केंद्र प्रेमीयुगल व मध्यपींचा अड्डा बनल्याचे निदर्शनास येत असून याकडे कुणीही लक्ष देर्त्तल का? असा संप्तत सवाल उपस्थित केला जात आहे.

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) मोहाडी (mohadi) येथे कोट्यावधी निधीची तरतुद करुन परिचारीका प्रशिक्षण केंद्राची इमारत उभी करण्यात आली आहे. त्याचे काम पुर्ण झाले असून त्याकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद (zilha parishad) व जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असतांना त्यांनी या इमारतीकडे सपशेल पाठ फिरवल्याचे निदर्शनास येते. दिमाखदार इमारत बघुन नक्कीच प्रत्येकाला आनंद होतो. परंतू त्यामध्ये सुरु असलेले नको ते उद्योग बघितल्यावर नक्कीच संताप होतो.

आपल्या परिसरात परिचारिका प्रशिक्षण केंद्राची निर्मित्ती होवून आरोग्याच्या दृष्टीने गाव व परिसराला त्याचा फायदा होईल, म्हणून आवश्यक ते योगदान व सहकार्य ग्रामपंचायतीने केले. परंतू ते सर्व विफोल ठरल्याने स्थानिकांमध्ये नाराजी तयार झाली आहे. सध्या निवडणूका (election) लांबल्याने ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद (zilha parishad) व पंचायत समिती (panchayat samiti) निवडणूका लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळे मोहाडी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती होवून लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांवर वचकच राहिला नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत मद्यपींचा अड्डा निर्माण झाला आहे. गेट व दरवाजे उघडेच असल्याने सरळ आतमध्ये प्रवेश करुन मद्यपीं त्या इमारतीचा उपभोग घेत आहे. आतमध्ये रिकामे ग्लास, दारुच्या बाटल्या पडलेल्या दिसून येत आहे. तसेच येथे प्रेमीयुगलांचे देखील प्रताप घडत असल्याचे बोलले जाते. एका बाजूला मोहाडी पोलिस ठाण्याचे आऊटपोस्ट तर मागच्या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्राची (Primary Health Center) इमारत असतांना या इमारतीचा होत असलेला वापर नक्कीच संतापनजक आहे.

तरी या इमारतीला कुणी वाली होईल का? असा सवाल विचारला जात आहे. या इमारतीला सुरक्षा रक्षकाची नेमणूक करुन या इमारतीची दुर्दशा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांनी याची दखल घेत हे परिचारीका प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देणे अपेक्षित आहे. तो पयर्ंंत या इमारतीची देखभालीची जबाबदारी संबंधित विभागाला देवून या इमारतीचे संरक्षण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जबाबदारी घेण्याची गरज

मोहाडी येथे परिचारीका प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली असली तरी ते प्रशिक्षण केंद्र सुरु केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या हेतूने हे प्रशिक्षण केंद्र सुरु होत होते तो हेतू साध्य होत नसल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकार्‍यांनी या इमारतीची जबाबदारी घेवून लवकरात लवकर प्रशिक्षण केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. येथे पहारेकरीची नेमणूक होणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद, आरोग्य अधिकारी व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे नाहीत अशा कोट्यावधी निधीतून उभारण्यात आलेल्या इमारती धुळखात पडून निधी वाया जाण्याची भिती आहे. सुरु होण्याआधीच दुरुस्तीसाठी निधी मागण्यांची वेळ येऊ नये, यासाठी वेळीच दखल घेतली जाणे आवश्यक आहे. तरी संबंधित अधिकारी आता यावर काही निर्णय घेतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत परिचारीका प्रशिक्षण केंद्राची इमारत मोठ्या दिमाखदार पध्दतीने उभी राहिली आहे. त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना होईल, अशी अपेक्षा ठेवून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हवे ते सहकार्य केले. इमारत बघुन नक्कीच अभिमान वाटत असला तरी त्याचा सुरु असलेला वापर बघुन नक्कीच दु:ख होते. योग्य नियोजन संबंधित अधिकार्‍यांनी न केल्यामुळे कोट्यावधींचा निधी खर्च करुन उभी राहिेलेली इमारत आज धुळखात पडली आहे. येथे त्वरीत प्रशिणार्थी विद्यार्थी व प्रशिक्षक नेमणे आवश्यक आहे. जो पर्यंत त्याची नेमणूक होवून प्रशिक्षण केंद्र सुरू होत नाही तो पर्यंत त्या इमारतीच्या देखभालीसाठी पहारेकरीची नेमणूक होणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी याची जबाबदारी घेणे आवश्यक असतांना कुणीही याकडे लक्ष देत नाही. ही एक शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधी का आवश्यक असतो तसेच निवडणूका लवकरात लवकर का व्हाव्यात, याचे उत्तर असे बेवारस इमारत व कोट्यावधी रुपयांचा होणारा अपव्यय बघितल्यावर लक्षात येते.

- प्रवीण जाधव, माजी जिल्हा परिषद गटनेते

Related Stories

No stories found.