महावितरणला थकबाकीचे ग्रहण

थकबाकीदारांना मोबाईलवर नोटिसा; वीज खंडित करण्याचा इशारा
महावितरणला थकबाकीचे ग्रहण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील घरगुती, पथदीप, पाणीपुरवठा, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर विभागांकडे तब्बल 339 कोटींची वीज थकबाकी असल्याचे समोर आले आहे. विशेष थकबाकी थकवणार्‍यांमध्ये शासनाच्या पाणीपुरवठा, पथदीप, पाणीपुरवठा या विभागांकडे मोठ्या प्रमाणात वीजबिलाची थकित रक्कम आहे. जे ग्राहक वीजबिलच भरणार नाही त्यांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक परिमंंडळामधील नाशिक आणि मालेगाव असे दोन मंडळ आहेत. या दोन्ही मंडळातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक आदी वर्गवारीच्या ग्राहकांकडे 339 कोटींची थकबाकी गेल्या काही महिन्यांपासून आहे. करोनाकाळात घरगुती ग्राहकांना महावितरणने चढ्या दराने वीजबिल दिल्याचा आरोप ग्राहकांनी केला होता, व्यावसायिकांनी दुकानेच उघडली नाहीतर वीज बिल आलीच कशी असा संतप्त सवाल केला होता.

ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरावे याकरिता महावितरणकडून वारंवार आवाहन केले जात आहे. नाशिक मंंडळामध्ये नाशिक शहर एक व दोन, नाशिक ग्रामिण व चांदवड असे विभाग येतात. तर मालेगांव मंडळामध्ये मनमाड, सटाणा, मालेगांव, कळ्वण हे विभाग आहेत. नाशिक मंडळात एकुण 228 कोटींची थकबाकी असून यात घरगुतीची सर्वाधिक 90 कोटींची थकबाकी असून त्याखालोखाल औद्योगिक ग्राहकांकडे 50 कोटीं, वाणिज्यिक 40 कोटी पाणीपुरवठाकडे 20 कोटी थकबाकी आहे.

दरम्यान, शासनाच्याच पाणीपुरवठा, पथदीप, सार्वजनिक सेवा या विभागाकडेच शंभर कोटीं पर्यत थकबाकी आहे. मालेगाव मंडळामधील पथदीप विभागाकडे सर्वाधिक 54 कोटींची थकबाकी आहे. शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे केली जातात, मात्र पथदीप, पाणीपुरवठा यांचे थकीत वीज बिल का भरले जात नाही असा सवाल केला जातो आहेे. महावितरण राज्य सरकारची महानिर्मिती, केंद्र सरकारच्या वीज कंपन्यांसह खासगी वीज कंपन्याकडून वीज घेउन ती राज्यभरातील ग्राहकांना वितरीत करीत असते. गेल्या वर्षी करोनामुळे लॉकडॉउन घेण्यात आला तेव्हापासून अनेक वीज ग्राहकांनी पैसे भरण्यास टाळाटाळ केल्याने याचा भार महावितरणवर आल्याचे चित्र आहे.

वीजबिल वसुलीसाठी मोहीम

एप्रिलपासून वीजबिलाची रक्कम वाढल्याचे चित्र आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता, कर्मचारी यांची टीम जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे जाऊन बिल भरण्याचे आवाहन करत आहे. जे ग्राहक वीजबिल भरणार नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जातो आहे. दरम्यान, महावितरणकडून ज्या ग्राहकांनी बिल भरले नाही त्यांच्या मोबाइलवर नोटिसा पाठवल्या जात आहेत.

अशी आहे थकबाकी

उच्च दाबमधील ग्राहकांकडे 21 कोटी 56 लाख, घरगुती 90 कोटी 58 लाख, वाणिज्यिकमध्ये 40 कोटी 18 लाख, औद्योगिक 50 कोटी 41 लाख, सार्वजनिक सेवा 3 कोटी 68 लाख, पाणीपुरवठा 20 कोटी 46 लाख, पथदीप 1 कोटी 57 लाख अशी एकूण 228 कोटी 44 लाखांची थकबाकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com