झोपडपट्ट्यांमधील समस्या जैसे थे
देशदूत न्यूज अपडेट

झोपडपट्ट्यांमधील समस्या जैसे थे

मनपाच्या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित

नाशिक रोड । प्रतिनिधी Nashik Road

सहाही प्रभागांमध्ये झोपडपट्ट्यांमधील (Slums) समस्या (Problem) जैसे थे आहेत. महापालिकेची निवडणूक (Municipal elections) दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे, मात्र पाच वर्षांत नागरिकांना महापालिकेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. लोकप्रतिनिधींनी झोपडपट्ट्यांचा वापर केवळ व्होट बँक (vote bank) म्हणूनच केला.

शासकीय अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. 2017 सालात नाशिक महापालिकेची निवडणूक (Election of Nashik Municipal Corporation) झाल्यावर नगरसेवक (Corporator) पांढरपेशा वस्त्यांमध्ये फिरले नाहीत. झोपडपट्ट्यांचा नाशिकरोड (nashik road) येथील भाग बराचसा दुर्लक्षित राहिला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे.

व्होट बँक म्हणून झोपडपट्ट्यांचा वापर करण्यात आला. नाशिकरोडला कॅनॉल रोडची सर्वात मोठी आम्रपाली झोपडपट्टी, मोरे मळा, गोरेवाडी, नोट प्रेसच्या बाजूला असणारी वसाहत भीमनगरजवळील घरे, जेतवननगर, उपनगर, पगारे मळा, आम्रपाली, ज्योतिबा फुलेनगर, इंदिरा विकासनगर, फर्नांडिसवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, मालधक्का रोड, सिन्नर फाटा, पवारवाडी, गुलजारवाडी, गोसावीवाडी, सुंदरनगर, रोकडोबावाडी, बागुलनगर, सुभाषरोड येथील झोपड्या. येथे झोपडपट्टी असून समस्यांचा मोठा डोंगर उभा राहिलेला आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटलेला नाही.

झोपडपट्ट्यांमध्ये महिलांना शौचालयाच्या अडचणी येत आहेत. शौचालयांमध्ये लाईट नसतात, पथदीप (Streetlight) बंद, गटारी तुंबलेल्या आहेत. शौचालयाच्या टाकीचे स्लॅब तुटल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, स्वच्छता कर्मचारी शौचालय साफसफाईसाठी येत नाहीत, महापालिकेला ऑनलाईन तक्रार (Complain online) टाकल्यावर हे ठेकेदाराचे काम आहे असे नागरिकांना उत्तर मिळते.

झोपडपट्ट्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डास, माशांचे साम्राज्य असते. त्यामुळे रोगराईला पोषक वातावरण निर्माण होत आहे. आरोग्य सेविका (Health worker) नावाला येतात. रस्त्याच्या सुविधाही अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नाहीत. पाण्यासाठी तर रोजच भांडणे करावी लागतात. लोकप्रतिनिधी झोपडपट्ट्यांमध्ये फिरकत नसल्याची बाब अनेक झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरसेवक केवळ मते मागायला येतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. झोपडपट्ट्यांमध्ये नगरसेवक फिरताना दाखवा आणि बक्षीस मिळवा ही स्पर्धा घेण्याची वेळ आली आहे. पाच वर्षांत समस्या जैसे थेच राहिल्या आहेत.

- विकास चंद्रमोरे, मालधक्का रोड

नगरसेवकांनी पांढरपेशा वस्त्यांचा जास्त विकास केला. झोपडपट्ट्यांमधील मूलभूत समस्या जैसे थे आहेत. सुलभ शौचालय नाही, पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आरोग्याच्या समस्या रोज निर्माण होतात. याकडे महापालिकाही लक्ष देत नाही.

- किरण जगताप, नागरिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com