एमआयडीसीच्या गाळे प्रकल्पाला समस्यांचा घेरा

सुविधा देण्यास टाळाटाळ
एमआयडीसीच्या गाळे प्रकल्पाला समस्यांचा घेरा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

एमआयडीसीच्या प्लॉट नंबर 28 वरील गाळे प्रकल्पातील उद्योजक एमआयडीसी व मनपा या दोन संस्थांच्या टोलवाटोलवीमुळे त्रस्त झाले आहेत. दोन्ही यंत्रणा सेवासुविधा पुरवत नसल्याने उद्योजकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

1995 साली एमआयडीसीने चार इमारतींचे गाळे प्रकल्प उभारले होते गाळे हस्तांतरित करताना सोसायटी उभारून देणे गरजेचे होते तसे केले गेले नाही या चारही इमारती लगत वाहनांच्या पार्किंगसाठी प्लॉट शिल्लक ठेवण्यात आला होता. बांधकामाच्या सात आठ वर्षानंतर तेथेही अतिरिक्त एफएसआय शिल्लक असल्याचे कारण सांगून इमारत उभी करण्यात आली त्यामुळे पुन्हा पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला.

मागील पंचवीस वर्षापासून इमारत पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी वाट पाहत आहे. मुख्य प्रवर्तक म्हणून एमआयडीसीनेच हे काम करणे अपेक्षित आहे, मात्र एमआयडीसीने इमारतीचे गाळे हस्तांतरित केल्यानंतर इमारतीवर देखभाल दुरुस्तीसाठी काहीही खर्च केलेला नाही सोसायटीमध्ये जाणारे रस्ते मातीचे आहेत. घंटागाडी गाळ्यांमध्ये येत नाही डीपी ची सुरक्षा व्यवस्था काही नसल्याने उघडी पडलेली आहे. भूमिगत गटार योजनेला जोडण्यासाठी कोणतीही पाईप योजना लावलेली नाही अनेक ठिकाणी सांडपाणी सांडून ओवरफ्लो झालेले पाणी वरून वाहत असते.

जाण्या-येण्यासाठी एकच जिना असल्याने धोकादायक झालेला आहे. पाण्याची पाईपलाईन छतावर टाकलेली असल्याने कायम गरम पाणी येत असते अशा एक ना अनेक समस्या या सोसायटीमध्ये आहेत.या समस्यांबाबत एमआयडीसीला सातत्याने संपर्क साधल्यानंतर ही फारसा प्रतिसाद मिळत नाही. मनपा प्रशासनाकडे घंटागाडी ड्रेनेज लाईन स्वच्छतेसाठी पाठपुरावा केल्यानंतरही त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही.

गाळे प्रकल्प भोवती घाणीचे साम्राज्य आहे गाळ्यांचे रस्ते पाण्याने चिखलाचे झाले आहेत. वाहनांच्या पार्किंग जागा नाही अशा एक ना अनेक समस्यांच्या वातावरणात व्यवसाय करीत आहेत या प्रश्नाची सोडवणूक कोण करणार असाच सवाल गाळेधारकांनी उपस्थित केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com