उद्योग क्षेत्रापुढे समस्यांचे आव्हान

उद्योग क्षेत्रापुढे समस्यांचे आव्हान

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिकच्या उद्योग क्षेत्रातील ( Nashik Industrial Sector ) त्रुटींबाबत शासन उदासिन असल्याचे दिसून येते आहे. या क्षेत्रातील विविध समस्यांमुळे उद्योजक त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे. नाशिकला दोन मोठे उद्योग येत असले तरी प्रस्थापित उद्योगाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न होत नसल्याने उद्योजक ( Entrepreneur ) चिंता व्यक्त करीत आहेत.

सीईटीपीचा प्रलंबित प्रश्न

औद्योगिक क्षेत्रातून नदीपात्रात प्रदूषित पाणी येत असल्याची तक्रार नेहमीच होत आली आहे. प्लेटिंग उद्योगांनी यावर तोडगा काढण्यासाठी उद्योजकांनी स्वतःचे सीईटीपी प्लांट उभारले असले तरीही कॉमन इफ्ल्यूएन्ट ट्रीटमेंट प्लांट (सिईटीपी) उभारणी साठी पुढाकार घेत निधी संकलित केला आहे, मात्र प्रशासनाच्या टोलवाटोलवी मुळे मागील दोन वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. याबाबत कोणीच पुढाकार घेत नसल्याने कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित होत आहे

रिक्त पदांचा प्रभारी भार

औद्योगिक क्षेत्राशी संलग्न असलेल्या विविध कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी प्रभारी अधिकार्‍यांच्या माध्यमातून काम चालले आहे. त्यामुळे ते तितकेसे सक्षमपणे होत नसल्याने उद्योजक चिंता व्यक्त करीत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी पदाचा पदभार औरंगाबाद कडे आहे. कामगार उपायुक्तांचा पदभार सहाय्यक आयुक्तांकडे आहे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांचा पदभार नगर कडे आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाचा सह आयुक्त पदाचा पदभार ठाण्याकडे आहे. अशा प्रभारी पदांमुळे स्थायी प्रश्नांकडे पूर्ण क्षमतेने लक्ष दिले जात नसल्याची तक्रार उद्योजक उपस्थित करीत आहेत याबाबत शासनाकडून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

झूम बैठकीची टोलवाटोलवी

उद्योगांचे प्रश्न तातडीने सुटावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा उद्योग मित्र अर्थात झूम बैठकीचे आयोजन केले जात होते. दर महिन्याच्या दुसर्‍या मंगळवारी ही बैठक होत होती, मात्र गेल्या दोन वर्षात कोवीडच्या प्रादुर्भावामुळे बैठक झाली नाही त्यामुळे उद्योजकांनी आपले प्रश्न कुठे मांडावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com