नवीन नाशिक : धोकादायक विद्युत तारा, पोल हटविले

नवीन नाशिक : धोकादायक विद्युत तारा, पोल  हटविले

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

शिवसंपर्क अभियानाअंतर्गत (Shivsampark Abhiyan) सुरू केलेल्या समस्या निवारण मोहिमेला यश येत आहे. तिडकेनगर (Tidkenagar), कर्मयोगीनगर (karmayoginagar) येथे महावितरण कंपनीने (MSEDCL) विद्युत प्रवाह नसलेल्या लोंबकळणाऱ्या धोकादायक तारा आणि पोल हटविण्यात आले आहेत....

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने (Shivsena) राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत उंटवाडी, पाटीलनगर, हेडगेवारनगर भागात शिवसेनेने समस्या निवारण मोहीम सुरू केली आहे.

तिडकेनगर, कर्मयोगीनगरमधील विद्युत प्रवाह नसलेल्या लोंबकळणाऱ्या तारा आणि वाकलेल्या विद्युत पोलमुळे अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता होती. ही बाब महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

याची दखल घेत तीनच दिवसात तात्याश्री चौक, प्रियंका पार्क, छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळा या परिसरातील धोकादायक तारा आणि विद्युत पोल काढून टाकण्यात आले. जगतापनगर येथील उघड्या डीपीचा तुटलेला दरवाजा बसविण्यात आला.

कालिका पार्क येथील श्रीराम व वैशाली रो-हाऊसमागील वाकलेला पोल काढण्यात आला. कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे (Maniklal Tapase), अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार (Pradeep Vattamwar), सहाय्यक अभियंता प्रदीप गवई (Pradeep Gawai) यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हे काम केले.

विद्युत तारा व पोल हटविल्याने सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, शिवसैनिक बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड, बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक आदींनी महावितरणचे आभार मानले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com