नाशिक | Nashik

विविध ठिकाणांवरील रस्त्यांवर भंगार वाहने पडली आहेत. अपघात, नादुरुस्त आणि वयोमर्यादा संपलेल्या वाहनांना रस्त्यांवरील जागेत भंगार अवस्थेत सोडले जाते.

त्यामुळे रस्त्यांवरील जागा व्यापल्या जात असून, वाहतूक कोंडी होते. त्यासाठी लवकरच वाहन स्क्रॅप पॉलिसी आणली जाणार आहे. अशा वाहनांची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परिवहन खाते याबद्दल आढावा घेत आहे.

राज्य आणि केंद्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातातील भंगार वाहने रस्त्यांच्या कडेलाच सोडल्याचे दिसते. अशा गाड्यांमुळे जागा व्यापली जात असून, वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहनांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकार वाहनांची स्क्रॅप पॉलिसी आणण्याच्या विचारात असताना केंद्र सरकारचे मात्र यासंदर्भातील काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या पॉलिसीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आरटीआेची मदत

केंद्राच्या स्क्रॅप पॉलिसीच्या घोषणेनंतर अशा भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये अशा वाहनांचे पार्ट वेगवेगळे आणि त्याचा चेचिस नंबर आरटीओला जमा करावा लागणार आहे. त्यानंतर अशा वाहनांची विल्हेवाट लावता येईल.