
पुनदखोरे । संदीप जगताप Punadkhore
कळवण (kalwan) शहरातील मेनरोडवरील (main road) रस्त्याचे काम (road work) दोन वर्षापासून अंत्यत संथगतीने सुरू आहे. शहरातील नागरीक यामुळे पुर्ण हैराण झाले असल्याने शहरातील सुरू असलेल्या कामाला गती कधी मिळेल असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
संथगतीने सुरू असणार्या कामामुळे तसेच रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खडड्यांमुळे (potholes) धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे अनेक आजारांना नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकांना वाहन चालवितांना तसेच पायी चालणार्या नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे. करोनामुळे (corona) अनेक महिने लॉकडाऊन (lockdown) असतांना सर्वांचे व्यवसाय ठप्प झाले होते.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवसाय पुर्वरत होत असतांना शहरातील सुरु असणार्या संथगतीच्या कामामुळे मेनरोड लगतच्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला (Financial loss) सामोरे जावे लागत आहे. अगोदरच लॉकडाऊनने सर्व साधारणांचे कंबरडे मोडले असुन संथगतीने सुरू असलेल्या कांमामुळे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहे.
आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत (Tribal Public Works Department) दोन वर्षापासून नामपुर (nampur), सिन्नर (sinnar), सटाणा (satana), वणी (vani), पिंपळगाव (pimpalgaon), निफाड (niphad), आणि कळवण (kalwan) या महामार्गाचे काम (Highway work) ठीकठीकाणी सुरु आहे. इतर शहरातील कांमाना बर्यापैकी गती मिळत असुन फक्त कळवण शहरातील कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) गाफील असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामांमुळे रस्त्यालगत वास्तव्यास राहणारे दुकांनदार तसेच नागरीक यांच्या घरांसमोर मोठमोठे खड्डे पडल्याने व्यवसाय करणे सुध्दा मुश्किल झाले आहे. त्यामुळे नागरिकांकडून सुरू असलेले संथगतीकाम तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मेनरोडच्या कामाला दोन वर्ष उलटूनही काम 20 टक्के सुद्धा पुर्ण झालेले नसल्याने सुस्तावलेली यंत्रणा कामाला गती कधी देणार असा प्रश्न सर्व सामान्यांना पडत आहे. तरी संबधित विभागाने कामाला गती देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी शहरातून होत आहे.
कोणावर विश्वास ठेवावा?
कळवण मेनरोडच्या कामाबाबत आमदार नितीन पवार यांनी अधिकार्यांना धारेवर धरत रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. काम लवकर मार्गी न लावल्यास 1 जानेवारी 2022 पासून आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा दिला होता. पंरतू 1 जानेवारी जाऊनही आंदोलनाला मुर्हत सापडलेला नाही. रस्त्याच्या कामाला पण गती मिळालेली नाही. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित राहत आहे.