समस्या दिंडोरीची: खेडगाव - वडनेर रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त कधी ?

समस्या दिंडोरीची: खेडगाव - वडनेर रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त कधी ?

खेडगाव । वार्ताहर | Khedgaon

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) खेडगाव परिसरातील वडनेर भैरव रस्त्याची (Vadner Bhairav road) अतिशय दयनीय अवस्था झाली असून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी (farmers) व नागरिकांनी केली आहे.

गेल्या पंधरा वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणार्‍या दोन तालुक्यांना जोडणारा खेडगाव- वडनेर भैरव रस्त्याची मागील एक वर्षीपूर्वी खडी- मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली होती. या कामाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. कारण दुरावस्था झालेल्या डांबरी रस्ते (Asphalt roads) खोदल्यानंतर खडी- मुरूम टाकून वर्षानुवर्ष पुढील डांबरीकरण (Asphalting) कामास वेळ काढूपणा होत असून धुळीचे व चिखलाचे साम्राज्य रस्त्यावर पसरत असते. हा अनुभव परिसरातील नागरिकांना असल्याने या कामाला विरोध केला होता.

परंतु सहा महिन्यानंतर लगेच डांबरीकरण केले जाईल, या आश्वासनानंतर कामास सुरुवात करण्यात आली होती. परंतु आज वर्ष होऊनही रस्त्याचे डांबरीकरण (Asphalting) होत नसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून डांबरीकरणास मुहूर्त कधी? असा प्रश्न परिसरातील शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. वेळोवेळी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन (memorandum) देऊनही कामाचा कुठलाच ठावठिकाणा लागत नसल्याने परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी जनआंदोलन (agitation) करण्याचा इशारा दिला आहे.

या रस्त्यावर डांबरीकरण खोदून खडी व मुरूम टाकल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे (potholes) पडले असून दगड वरती आले आहे. तसेच धुळीमुळे परिसरातील द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे. रस्ताने ये-जा करणारे दूध व्यवसायिक, शेतकरी, परिसरातील गावांकडून खेडगाव विद्यालयात जाणारे विद्यार्थी (students) यांना या अर्धवट अपूर्ण कामाचा प्रचंड त्रास होत आहे.

या रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. अर्धवट कामामुळे तसेच रस्ता खोदून खडी -मुरूम टाकल्याने वाहने घसरून अपघात होत आहे. ग्रामस्थांच्या या अडचणीची सोडवणूक व्हावी याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com