पर्यावरण जपणार्‍या दिंड्यांंना पारितोषिक

पर्यावरण जपणार्‍या दिंड्यांंना पारितोषिक

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

निर्मळवारी अंतर्गत पर्यावरण जपणार्‍या दिंड्यांना नगरपालिकेच्या वतीने पारितोषिक वितरण करून सन्मान करण्यात आला. या उपक्रमाने दिंडी वारकरी भारावले.

स्वच्छतेला प्राधान्य पर्यावरणाला पूरक शिस्तप्रिय स्वच्छ सर्वेक्षण निर्मळ वारी या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणार्‍या दिंड्यांचा सन्मान नगरपालिकेकडून करण्यात आला. पालिकेचे प्रशासक संजय जाधव यांच्या कल्पनेतून हे पारितोषिक वितरण झाले. निर्मळ दिंडी उपक्रमात पर्यावरण संवर्धन, पर्यावरण- रक्षण, प्लास्टीक बंदी, पाण्याचा मर्यादीत वापर, कच-याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन या तत्वावर त्र्यंबकेश्वर शहरातील आलेल्या एकूण 500 दिंडयाचे मुल्यांकन या तीन दिवसांमध्ये करण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट पाच दिंडीची पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. सदर पारितोषीक विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व दिंडी उपयोगी साहित्य साहित्य वितरीत करण्यात आले.

प्रथम पारितोषीक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साऊंड सिस्टीम कृष्णाई प्रतिष्ठान पायी दिंडी सोहळा, जायखेडा, सटाणा जि. नाशिक,

व्दितीय पारितोषीक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शेगडी व थर्मास भव्य पायी दिंडी सोहळा, धोडप किल्ला, चांदवड जि. नाशिक

तृृत्तीय पारितोषीक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पायी दिंडी सोहळा, ता. सिन्नर, जि. नाशिक , श्री क्षेत्र शिखर बाळेश्वर पायी दिंडी सोहळा, बाळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, संतजनार्दन स्वामी पायी दिंडी दिक्षी यांना देण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, निर्मलवारी अभियानाचे अध्यक्ष भरत केळकर, यात्रा नियोजन दक्षता समिती अध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, त्रिवेणी तुंगार, समिती सदस्य कैलास चोथे, समाजसेवक दिलीप पवार, निर्मलवारी सुनिल लोहगांवकर , अधिकारी पायल महाले, अभिजीत इनामदार, राहुल शिंदे, पंकज शिंपी, अनिता गुंजाळ, नितीन शिंदे, संजय लगड , अमोल दोंदे इ. अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त मानक-यांचे वतीने पाटोळे रामनगर आटकवडे, पायी दिंडी सोहळ्याचे आयोजक संपत कराड यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com