कलातीर्थ महोत्सवात ‘काजवा’ला पारितोषिक

कलातीर्थ महोत्सवात ‘काजवा’ला पारितोषिक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शंकराचार्य न्यासच्या सांस्कृतिक विभाग (Cultural Department) प्रस्तुत ’कलातीर्थ लघुपट महोत्सव 2020’ (Kalatirtha Short Film Festival 2020) मध्ये कोल्हापूरच्या (kolhapur) उमेश बोलके (Umesh Bolke) यांच्या ‘काजवा‘ (kajva) लघुपटास उत्कृष्ट चित्रपटासह लेखनाचे पारितोषिक मिळाले. बोलके यांच्याच ‘संगर‘ (sangar) चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शक (Excellent director) व संगीताचे पारितोषिक (Music Award) प्राप्त झाले. महोत्सवात कोल्हापूरकरांनी बाजी मारली.

नाशिकच्या (nashik) संजय शास्त्री (Sanjay Shastri) यांच्या ’गन्स अँन्ड लव्हर्स’ (Guns and Lovers) या लघुपटास उत्कृष्ट संपादन व उत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफरचे पारितोषिक (Cinematographer's Award) जाहीर झाले. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात ऑनलाईन (online) पध्दतीने पारितोषिक वितरण समारंभ झाला. चित्रपट, संगीत क्षेत्रातील आघाडीच्या अस्तित्व व आयरिस या संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव झाला. महोत्सवात सुरूवातीला भारतमाता व दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर क्रमाक्रमाने लघुचित्रपटांचे प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण झाले.

विविधांगी विषय

चाकोरीतील चलचित्रांचा गौरव अशा आकर्षक मथळयाखाली ’कलातीर्थ’चा हा महोत्सव गेल्या पाच वर्षापासून घेण्यात येतो. यंदाच्या महोत्सवात एक ते दहा मिनिटांच्या 43 फिल्म दाखवण्यात आल्या. वेगळ्या धाटणीच्या या लघुपटांनी सर्वांचेच लक्ष वेधले. काजवा, संगर, गन्स अँन्ड लव्हर्ससारख्या लघुपटांचे विषय हदयस्पर्शी होते. त्यामुळे या तीन-चार लघुपटांत चुरस दिसली.

‘कलातीर्थ‘ परराज्यात

दादासाहेब फाळके यांच्या नावाने हे पुरस्कार देण्यात येतात. यावेळी फाळकेंचे कुटूंबीय जरूर हजेरी लावतात. यंदाच्या महोत्सवात महाराष्ट्रासह आंधप्रदेश, केरळ, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगालच्या संस्थांनी भाग घेतला. महोत्सवात यंदा प्रथमच महाराष्ट्राबाहेरील राज्यांनी आपल्या प्रवेशिका नोंदवल्या. पराग बिश्वास यांची ’टेरेरिस्ट’ ही वेगळया फिल्मची प्रवेशिका कलातीर्थ महोत्सवात आली. आयरीसच्या पदाधिकार्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पारितोषिक वितरण समारंभासाठी नाशिकमधील लेखक,कलावंत प्राजक्त देशमुख, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष देविदास(बापू) जोशी, स्वाती काळे, आईसच्या शिला पाटील हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन औपचारिक गौरवण्यात आले. शौनक गायधनी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. ऋचा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धा निकाल

  • उत्कृष्ट फिल्म (एक मिनिट- इम्पोर्टेट इन वर्ल्ड पॉप्युलेशन

  • उत्कृष्ट फिल्म-काजवा (उमेश बोलके,कोल्हापूर)

  • उत्कृष्ट दिग्दर्शक-उमेश बोलके, चित्रपट-संगर (कोल्हापूर)

  • उत्कृष्ट लेखन-काजवा (उमेश बोलके, कोल्हापूर)

  • उत्कृष्ट संपादन -गन्स अँन्ड लव्हर्स संजय शास्त्री (नाशिक)

  • उत्कृष्ट सिनेमेट्रोग्राफर-गन्स अँन्डज लव्हर्स

  • उत्कृष्ट संगीत-संगर (कोल्हापूर)

  • परीक्षणाठी विशेष पारितोषिक - स्पेशल ज्युरी अँवॉर्ड-टेररिस्ट (पराग बिश्वास,पश्चिम बंगाल)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com