
नाशिक । प्रतिनिधी Nashik
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड (awareness of hygiene among students) निर्माण होऊन जबाबदार नागरिक निर्माण व्हावी,यासाठी आयोजित स्वच्छ विद्यालय स्पर्धेेतील विजेत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad ) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ( ZP CEO- Leena Bansod ) यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. जिल्ह्यातील 44 शाळांनी विविध गटांतील हे पुरस्कार स्वीकारला.
गंगापूर रोडवरील मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या सीएमसीएस महाविद्यालयात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम, नीलेश पाटोळे, शिक्षण विभागातील सेवक उपस्थित होते.
स्वच्छ विद्यालय स्पर्धा पुरस्कार 2021-22 साठी नाशिक जिल्ह्यातील सहा विविध क्षेत्रात सर्वसाधारण व उपश्रेणीमध्ये निवड झालेल्या 38 शाळांतील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होऊन जबाबदार नागरीक निर्माण होण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. देशातील सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य निकोप ठेवण्यासाठी शाळांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा करुन घेत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंआ बनसोड यांनी केले.
सर्वसाधारण पुरस्कार
जिल्हा परिषद शाळा, जऊळके (ता.दिंडोरी) जिल्हा परिषद शाळा, उभाडे (ता.इगतपुरी) जिल्हा परिषद शाळा रेडगाव (ता.निफाड) केआरटी हायस्कूल मोहाडी (दिंडोरी) पातळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी (ता.सिन्नर) गोबल इंटरनॅशनल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, ता.दिंडोरी शिशुविहार व बालमंदिर प्राथमिक मराठी शाळा मनपा, नाशिक केंद्रीय विद्यालय एअर फोर्स (ता.नाशिक)
उपश्रेणी पुरस्कार
जिल्हा परिषद शाळा सोनांबे (ता.सिन्नर) अभिनव बालविकास मंदिर, उत्तमगर जिल्हा परिषद शाळा कारसूळ (ता.निफाड) सुशिलाताई प्रभाकर सोनवणे सेमी इंग्लिश स्कूल (ता.बागलाण) पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी, नाशिक केंद्रीय विद्यालय आर्टलरी सेंटर, वडनेरगेट नाशिक भारतरत्न अटलबिहारी वाचपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, भोयेगाव (ता.चांदवड) जिल्हा परिषद शाळा निमगव्हाण (ता.चांदवड) नवजीवन डे स्कूल नांदूरशिंगोटे (ता.सिन्नर) सिध्दी इंग्लिश मेडियम स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेज (ता.बागलाण) के. के. वाघ इंग्लिश प्रायमरी स्कुल सरस्वती नगर, नाशिक