गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण

गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2022 (Eco-friendly Ganesh festival by Municipal Corporation )घेतली होती. पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, आरास आणि पर्यावरणपूरक विसर्जन अशा निकषावर ही स्पर्धा आधारीत होती. प्राप्त प्रवेशिकांमधून वरील तीन निकष पूर्ण करणार्‍या उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली. प्रथम तीन क्रमांकाचे मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक स्वाती सारंग पाटील यांना मिळाला. त्यांना 10 हजारांचा धनादेश आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सातपूरच्या अशोक नगर भागातील त्या रहिवासी आहेत. ‘वाचन संस्कृती टिकायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी’ या विषयावर त्यांचा देखावा होता. त्यांना त्यांचे 85 वर्षांचे सासरे विष्णू पाटील यांचीही मदत झाली.

द्वितीय विजेते राहुल जयवंतराव शिंपी आहेत. त्यांचा ‘विविधतेत एकता’ या विषयावर देखावा होता. त्यांना पाच हजारांचा धनादेश आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तृतीय क्रमांक अपर्णा अभय नाईक यांना मिळाला. त्यांचा विषय ‘पारंपरिक उर्जा स्त्रोतचा वापर’ हा होता. त्यांना तीन हजारांचा धनादेश आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

यावेळी अतिरीक्त आयुक्त अशोक आत्राम, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवात मनपाने सुमारे दोन लाख गणेशमूर्तींचे संकलन करुन नदी पात्राचे होणारे प्रदूषण रोखले होते. गेल्या काही वर्षातील हा उच्चांक होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com