खासगी रुग्णालयाचा एक हजार रेमडिसीव्हरचा साठा रोखला

खासगी रुग्णालयाचा एक हजार रेमडिसीव्हरचा साठा रोखला
USER

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात रेमडिसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा असताना एका खासगी रुग्णालयाला देण्यात आलेला एक हजार इंजेक्शनचा साठा शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी परत मागवण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाला दिले.

नाशिक महानगरात रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी लोकांची भटकंती सुरू असताना अन्य रुग्णालये वगळून नवीन नाशिक विभागातील एका मोठ्या रुग्णालयाला 1000 इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना मिळाली. त्याची दखल घेत त्यांनी याबाबत अन्न व औषधे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डी.एम.भामरे यांना चांगलेच धारेवर धरले. नंतर त्यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत या खाजगी रुग्णालयाला देण्यात आलेला साठा परत मागविण्याचे आदेशही भुजबळ यांनी तत्काळ दिले आहे.

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलचा खुलासा

सदर हॉस्पिटल हे बहुराष्ट्रीय हॉस्पिटल नेटवर्कचा भाग आहे. नाशिकमधील मुख्य वितरकांकडून रेमडेसिवीरचा स्टॉक उपलब्ध होत नसल्यामुळे मेडीकव्हर हॉस्पिटलच्या भारतातील इतर 16 हॉस्पिटलमधून 1000 चा स्टॉक हा नाशिक, औरंगाबाद आणि संगमनेर शाखेसाठी आला होता. मेडीकव्हर हॉस्पिटलने रीतसर कंपनीकडून आलेला स्टॉक हा उपलब्ध झाल्यामुळे, काल एफडीए यांच्या विनंतीनुसार 100 चा स्टॉक हा मालेगावला पाठवण्यात आला.

मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्याच्या एफडीएशी संपर्क करून याची खात्री केली आहे. शासनाच्या आदेशानुसार रेमडेसिवीर औषधांची जबाबदारी ही हॉस्पिटलची असल्याने हॉस्पिटलने हा स्टॉक मागवला. आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलने दिलेला सदरचा स्टॉक महाराष्ट्रातील मेडीकव्हरच्या तीन हॉस्पिटलसाठी होता. सद्यस्थितीत अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये 150 पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत व त्यासाठी रोज साधारण180 ते 190 इंजेक्शनची गरज असते. व सदरचा स्टॉक हा फक्त 2/3 दिवस पुरेल इतकाच आहे. हॉस्पिटल प्रशासन हे प्रामुख्याने नमूद करते की, हॉस्पिटल प्रशासनाने तपास अधिकार्‍यांना तपासासाठी लागणारी सर्व कागदपत्र सादर केले आहे. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

जास्तीचा साठा अव्यवाहारिक : जिल्हाधिकारी

आज दिल्या आहेत. त्याचबरोबर उत्पादक कंपनीशी सुद्धा संपर्क करून त्यांनी कोणत्याही हॉस्पिटलना यापुढे अवाजवी पुरवठा करु नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून केंद्रीय पद्धतीने वाटपासाठी अधिक कोटा जिल्ह्याला उपलब्ध राहील. नाशिक जिल्ह्यात आपण थेट हॉस्पिटलला कोटा वाटप करण्याची सुरू केलेली कार्यपद्धती परिणामकारक ठरत असून त्यामुळे उपलब्धतेच्या प्रमाणात, अत्यवस्थ रुग्णांना औषध पोहोचवणे आपल्याला शक्य होऊ लागले आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय कंट्रोल रूम द्वारे संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com